ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मोठी बातमी; 98 हजार शेतकऱ्यांना 1800 कोटींचे पीक कर्ज, या चार बँकांनी ठेवले इतके उद्धिष्ट.

Big news; Crop loans of Rs 1,800 crore to 98,000 farmers are the targets set by these four banks.

Big news; Crop loans of Rs 1,800 crore to 98,000 farmers are the targets set by these four banks. पीककर्ज (Crop loan) शेतकऱ्यांना (To farmers) खरीप पीक कर्ज देण्यात येणार होते त्या कर्जामध्ये वाढ केलेली आहे. जिल्ह्यातील ९८ हजार शेतकऱ्यांना १८०२ कोटी रुपयांचे पीककर्ज (Crop loan) वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पीक कर्जाचे (crop loan) प्रमाण ६५ टक्के इतके आहे.

जिल्हा बँकेने 467 कोटींचे तर राष्ट्रीयीकृत बँकांनी 1 हजार 183 कोटींचे वाटप केले –

सध्या ९८ हजार शेतकऱ्यांना १८०२ कोटी कर्ज वाटप झाले, एकूण कर्ज वाटप उद्दिष्टाचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण अवघे ५७ टक्के इतके होते. जिल्ह्याला (To the district) यावर्षी दोन हजार ७८० कोटींचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. राष्ट्रीयीकृत (Nationalized) व त्या खालोखाल जिल्हा बँकेला उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापैकी ४६७ कोटींचे वाटप केले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी (By nationalized bank) १ हजार १८३ कोटींचे वाटप केले आहे. खासगी व ग्रामीण बँकांचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी कर्ज वाटपाचे प्रमाण फक्त ५७ टक्के होते. यंदा हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के अधिक आहे.

वाचा –शेतकऱ्यांसाठी ‘या’ बँकेने काढली योजना; शेतीच्या कामासाठी अगदी कमी व्याजदरात मिळणार कर्ज..

दीड महिन्यांनी पीक कर्जाला गती आली –

गेल्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा यावर्षीचे कर्ज वाटपाचे प्रमाण अधिक आहे. शासन शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी (For kharif crop) मदत व्हावी म्हणून कर्ज देते. जुन्या कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज देखील दिले जाते. जिल्ह्याला या वर्षी दोन हजार ७८० कोटींचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. परंतु या वर्षी मान्सूनला विलंब झाल्यामुळे पीक कर्ज मागणीदेखील फारशा आल्या नाही. तसेच कर्ज वितरणाची प्रक्रियादेखील संथ गतीने सुरू होती. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी, पालकमंत्री (Collector, Guardian Minister) यांनी बँकांचा आढावा घेत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याच्या सूचना बँकांना दिल्या. त्यांनतर दीड महिन्याच्या विलंबाने मान्सूनचे (Of the monsoon) आगमना नंतर पीक कर्जाची मागणी वाढत गेली आणि कर्ज प्रक्रियेला (To the debt process) गती आलेली दिसत आहे.

खरीप पीक कर्ज वाटप उद्दिष्ट – २ हजार ७८० कोटी

१) राष्ट्रीयीकृत बॅक

उद्दिष्ट – १ हजार ८७२ कोटी
वाटप – १ हजार १८३ कोटी

२) खासगी बॅक

उद्दिष्ट – ३६५ कोटी
वाटप – २७६ कोटी

३) ग्रामीण बँक

उद्दिष्ट – ८ कोटी
वाटप – ५.७० कोटी

४) जिल्हा बँक

उद्दिष्ट – ५३५ कोटी
वाटप – ४६७ कोटी

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button