मोठी बातमी, पीएम किसान योजनेबाबद केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता हे कार्ड असेल तरच मिळणार 10 वा हप्ता..
देशभरातील शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यावर लवकरच पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनेक राज्यांतून फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय (Decision) घेतला. हे नियम काय आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य
केंद्र सरकारच्या (Central Government) नवीन नियमानुसार जर पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची गरज लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य असणार आहे. रेशन कार्डवर (ration card) नाव असणाऱ्या लोकांपैकी एकाला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्र सरकारकडून (Central Government) सांगण्यात आहे.
वाचा –
कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देता येणार
केंद्र सरकारने (Central Government) नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करत या योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया अजून सोपी केली आहे. सातबारा आधार कार्ड (Aadhaar card) बँक पासबुक (Bank passbook) आणि प्रतिज्ञापत्र यांची हार्ड कॉपी जमा करणे अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावी लागणार आहे त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –