मोठी बातमी; पुढील आठवड्यात विविध राज्यातील 6 दिवस या कारणामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार..
पुढील आठवड्यातही देशाच्या विविध भागात अनेक सण साजरे केले जातील. यामुळे बँकांमध्ये सुट्टी असेल. जर एखाद्या राज्यात बँका बंद राहिल्या तर दुसऱ्या राज्यात बँकिंगचे काम चालू राहील. या सगळ्या सुट्ट्या एकत्रित केल्यास देशाच्या विविध भागात येत्या आठवड्यात सलग सहा दिवस बँका बंद राहतील.
या विषयी सविस्तर माहिती पाहुया –
वाचा –
कोणत्या सणांसाठी बँका बंद असतील?
18 ऑक्टोबर- आसामच्या गुवाहाटीमध्ये काटी बिहू उत्सवामुळे बँका बंद राहतील.
19 ऑक्टोबर- पैगंबर मुहम्मद यांची जयंती असलेल्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने नवी दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, बेलापूर, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची येथे बँका बंद राहतील. लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकिंग ऑपरेशन्स होणार नाहीत.
20 ऑक्टोबर – वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळुरू, चंदीगड, शिमला, कोलकाता आणि अगरतळा येथे बँका बंद राहतील.
22 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
23 ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे भारतभर बँका बंद राहतील.
24 ऑक्टोबर – रविवारी बँका बंद राहतील.
फक्त ऑनलाईन सेवा सुरु राहणार –
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनदर्शिकेनुसार, या सुट्ट्या संबंधित प्रदेशातील सणांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका राज्यात बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यासाठी तोच नियम लागू असेलच असे नाही. या सगळ्याचा हिशेब करता ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहतील. या काळात केवळ बँकेच्या शाखा बंद राहतील. मात्र, एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार सुरु राहतील. परिणामी ग्राहकांना पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
वाचा –
रिझर्व्ह बँकेकडून IMPS लिमिटच्या नियमात बदल –
गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण जाहीर करताना प्रत्येक व्यवहारासाठी IMPS मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. या निर्णयाबाबत आरबीआयने म्हटले आहे की यामुळे डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत होईल, तसेच त्यांना 2 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे व्यवहार करणे सोपे झाले आहे.
IMPS म्हणजे तत्काळ मोबाईल पेमेंट सेवा. सोप्या शब्दात, IMPS द्वारे, तुम्ही कोणत्याही खातेधारकाला कुठेही, कधीही पैसे पाठवू शकता. यामध्ये पैसे पाठवण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही IMPS द्वारे पैसे काही सेकंदात, दिवसातील 24 तास, आठवड्याचे सात दिवस कधीही हस्तांतरित करू शकता. RTGS, NEFT किंवा IMPS सारख्या सुविधांसाठी इंटरनेट आवश्यक आहे. जर तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप नसेल, तर तुम्ही इंटरनेट सुविधा असलेल्या स्मार्टफोनवरूनही IMPS चा वापर करु शकता.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा