मोठी बातमी; जनावरांच्या मृत्यू मागे मिळणार नुकसान भरपाई, असा अर्ज करा व घ्या ‘या’ योजनेचा लाभ …
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे (farmers) झालेले नुकसान आपण पाहिले आहे. यामध्ये जनावरेही अनेक मृत्यू पावले. अनेक ठिकाणच्या जनावरांच्या अंगावर वीज कोसळली तर अनेक शेळ्या मेंढया पाण्यात वाहून गेल्या. या नुकसान भरपाईमध्ये प्रशासनाकडून आर्थिक मदत केली जाते. जनावरे या अतिवृष्टीमध्ये दगावली असता शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती घेवूया..
वाचा –
सर्वात आधी ही कामे करा –
१) सर्वात आधी दगावलेल्या जनावरांची माहिती गावच्या तलाठी यांना द्यावी लागेल. घटना कधी व कशी झाली याचीही माहिती सविस्तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याना द्या.
२) जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला या अर्जामध्ये शेतकऱ्याचे नाव, जनावराचे नाव व वय तसेच त्या घटनेबद्दल सविस्तर माहिती द्यावी. सोबत उपस्थित असलेल्या नागरिकांची स्वाक्षरी घ्यावी लागेल.
३) तलाठी व पशूवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी जावून योग्य तपासणी करत आसतात.
४) यानंतर योग्य तपासणी केल्या नंतर व योग्य माहिती जमा केल्या नंतर शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना नुसार मदतीसाठी पात्र ठरवला जातो.
मदत अशी दिली जाते –
तलाठी तसेच पशुवैद्यकीय अधिकारीघटनास्थळी पोहचून पाहणी केल्यानंतर मृत्यू पावलेल्या जनावरांची रक्कम ठरवतात. यातून ५० टक्के रक्कम मदत म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. अशा घटना २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना दिली पाहिजे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा