मोठी बातमी, शेळीपालन अनुदान योजनेवर 50% अनुदान; पहिल्या टप्प्यात या 3 जिल्ह्यांना मिळणार लाभ..
शेतकऱ्यांसाठी (farmer) एक आनंदाची बातमी आहे. आता शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बाजारात बोकडाचे दर आणि वाढणारी मागणी पाहता शेती (Agriculture) व्यवसायाला हा जोड व्यवसाय दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. या हेतूने राज्य सरकारडून (state government) याला कशा स्वरुपात अनुदान मिळते. तरुणांना देखील आपला एखादा व्यवसाय उभारण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याकरिता 50 टक्के अनुदानही मिळते. त्यासाठी काय कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत? या योजनेचा लाभ कसा घेयचा? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत…
वाचा –
“या” जिल्ह्यांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले-
शेळी पालन अनुदान योजना (Goat rearing grant scheme) महाराष्ट्र 2021 अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या अनुशंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा तसेच दुसर्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्हयांसाठी 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून दिले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) ही योजना राबवली जात आहे.
वाचा –
व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान –
शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यास (farmer) सुरवातीला 2 लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्यांसाठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्यास पदरुन करायची आहे. प्रत्येक प्रवर्गासाठा हीच अट असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिली जाणार आहे. यासाठी सर्व प्रकल्प उभा करुन अनुदानाची प्रक्रीया करता येणार आहे.
20 शेळ्या, 2 बोकड योजना :
पध्दतीने शेळी आणि बोकडाची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरुपात किंवा शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार सुरु करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या 6 हजार रुपये किमतीच्या तर 2 बोकड हे 8 हजार रुपये किमतीचे खरेदी कराव्या लागणार आहेत. म्हणजे एकूण 1 लाख 36 हजाराची खरेदी करावी लागणार असून अनुदानस्वरुपात शेतकऱ्यांना 68000 हजार रुपये हे मिळणार आहेत. तर शेळ्यांच्या गोठा 450 चौ.फु बांधावा लागणार आहे. 212 चौ.फु यामप्रमाणे गोट्याला 95000 हजार रुपये खर्च येणार असून पैकी 47500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपाच मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –