मोठी बातमी; राज्यातील 44 साखर कारखाने काळ्या यादीत, साखर आयुक्तांचा निर्णय…
महाराष्ट्रातील जवळपास 44 साखर कारखान्यांना (Sugar factories) राज्याच्या साखर आयुक्तांनी काळ्यायादीत टाकले आहे. कारखान्यांनी (factories) विविध मार्गांचा अवलंब करीत शेतकर्यांची (farmers) फसवणूक केल्याचा आरोप साखर आयुक्तांनी केला आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया…
वाचा –
मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेतला निर्णय –
राज्यातील काही कारखाने शेतकऱ्यांना (farmers) वेळेवर उसाचे पैसे देतात. त्यामुळे सक्षम कारखाना कोणता आहे शेतकऱ्यांना (farmers) सहज समजायला हवे, यासाठी राज्यातील (state) सर्व साखर कारखान्याचा (factories) लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.
वाचा –
काळ्या यादीत समावेश असणारे कारखाने –
जय भवानी गेवराई, किसनवीर भुईंज, लोहारा मधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना, पैठण मधील शरद कारखाना, लातूरचा पन्नगेश्वरशुगर, तासगाव आणि खानापूर युनिट, नंदुरबारचा सातपुडा तापी, औसा मधील साईबाबा शुगर, वैद्यनाथ कारखाना इत्यादी कारखान्यांचा (factories) समावेश या यादीत आहे.
मागील गळीत हंगामातील काही कारखान्यांनी उसाची एफआरपी (FRP) अजूनही शेतकऱ्यांना (farmers) दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना (farmers) जास्त रकमेचे आमिष दाखवणे आणि नंतर त्यांची फसवणूक करणे, ऊस गाळपास नकार देणे, काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा (FRP) जातीचे रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशाप्रकारे काही साखर कारखान्यांकडून (Sugar factories) फसवणूक केली जात आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा