मोठी बातमी; राज्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधी मंजूर, 4 दिवसात मदतीचे वाटप करणार..
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी मदतीच्या आशेवर डोळे लावून बसला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय ६ ऑक्टोबर २०२१ रोजी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत घेण्यात आला. राज्य (State) आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार येत्या चार दिवसांत या मदतीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे, मार्च ते मे दरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १२२ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
संपूर्ण पंचनामे होण्यास वेळ लागणार असून अजूनही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीतच अधिक वेळ न घालवत तूर्तास प्रचलित पद्धतीनुसार मदत द्यावी, अशी भूमिका काही मंत्र्यांनी मांडली. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आणि तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला.
३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झालेल्या नुकसान ग्रस्तांना मदत –
अतिवृष्टीमुळे जुलैपर्यंत ४ लाख २१ हजार हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले होते. आतापर्यंत १६ लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पुढच्या १० दिवसात सर्व पंचनामे करून होतील. ज्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळणार असल्याचे सांगितले आहे.
वाचा –
या ठिकाणी शेतकऱ्यांना १२२ कोती २६ लाख रुवयांची मदत जाहीर-
गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांतील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १२२ कोटी २६ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून हा निधीही वितरित करण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा