Milk Rate | अर्रर्र..! दूध उत्पादकांना मोठा फटका; दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
Milk Rate | Arrrr..! Big hit for milk producers; Reduction of 'so much' rupees in the price of milk, intense anger among farmers
Milk Rate | गोकुळ दुध संघाकडून (Gokul Dudh Sangh Kolhapur) सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. संघाने महाराष्ट्रातील दूध दराच्या (Milk Rate) तुलनेने म्हैस दूध दरात दोन रुपये आणि गायीच्या दूध दरात तब्बल साडेचार रुपये कपात केली आहे.
बेळगाव तालुक्यातील जवळपास ७० गावांतील शेतकरी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाला दूधपुरवठा करतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील दराप्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांना दर मिळत होता; पण तीन दिवसांपूर्वी गोकुळ दूध संघाने पत्रक पाठवून दर कमी करण्यात आले आहेत.
यामुळे सीमाभागातील दूध उत्पादक शेतकरी आणि संकलन केंद्राच्या संचालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजता अलतगा (ता. बेळगाव) येथील गोकुळ संघाच्या एकत्रीकरण केंद्रांवर ७० गावांतील दूध उत्पादक मोर्चा काढणार असल्याचे गोकुळ दूध संघाला कळविले आहे.
तसेच त्या दिवशी गोकुळ संघाच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि संचालकांना चर्चेसाठी बोलावले आहे. सीमाभागातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अलतगा येथे सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहनही सीमावर्ती भागातील दूध संकलन केंद्राच्या संचालकांनी केले आहे.
वाचा | ५ रुपये अनुदान मिळवायचं? फक्त गाईचं टॅगिंग करा आणि या प्रकारे ऑनलाइन नोंदणी!
दुधाच्या दरात कपात का?
गोकुळ दूध संघाने सीमाभागातील दूध दरात कपात का केली याचे स्पष्टीकरण अद्याप दिले नाही. मात्र, कर्नाटक राज्यात दूध दरात कपात झाल्याने गोकुळ दूध संघानेही दर कमी केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुधाच्या दरात कपात झाल्याने काय परिणाम होईल?
दुधाच्या दरात कपात झाल्याने सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक परिणाम होईल. शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा खर्च भागवणे कठीण होईल आणि त्यांचे उत्पन्न कमी होईल.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील दूध दराप्रमाणेच दर देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, ते तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.
महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेईल?
महाराष्ट्र सरकार सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचे काय परिणाम होतील?
गोकुळ दूध संघ आणि सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाद वाढत आहे. या वादाचा परिणाम दूध उत्पादनावर आणि ग्राहकांवर काय होईल हे पाहणे बाकी आहे.
Web Title | Milk Rate | Arrrr..! Big hit for milk producers; Reduction of ‘so much’ rupees in the price of milk, intense anger among farmers
हेही वाचा