ताज्या बातम्या

राज्यात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ! जाणून घ्या; ‘या’ दरवाढी मागची कारणे..

Big hike in diesel and petrol prices in the state! Learn; Reasons behind this price hike.

राज्यात इंधनाची (Of fuel) दरवाढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, गेल्या आठवड्याभरात पेट्रोल व डिझेलच्या (Of petrol and diesel) दरवाढीचे नवीन उच्चांक आपणास पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 27 आणि 28 पैशांनी महागले. पेट्रोलचा (Petrol) आजचा दर 103.63 रुपये तर डिझेलचा (Diesel) दर 95.72 रुपये इतका आहे. तर प्रतिलीटर पॉवर पेट्रोलसाठी 107.64 रुपये मोजावे लागत आहेत.

अशीच पेट्रोल व डिझेलमध्ये दरवाढ होत राहिल्यास, येत्या काळामध्ये पेट्रोल 115 ते 120 रुपये प्रति लिटर इतकी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

[metaslider id=4085 cssclass=””]

दिवसेंदिवस डिझेल व पेट्रोलच्या किमतीत वाढ होत आहे?
Diesel and petrol prices are rising day by day?
एका अहवालात म्हटलं, “एक अण्वस्त्र कराराची शक्यता सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर प्रभाव पाडते आहे. जर अमेरिका आणि इराणमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले तर कच्च्या तेलाचा मुबलक पुरवठा बाजारात होईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारतात दैनंदिन व्यवहार पूर्णपणे सुरळीत झालेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल डिझेलची मागणी आधीच्या स्तरावर पोहचलेली नाही. मात्र, लवकरच परिस्थिती सामान्य होऊन मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील कच्च्या तेलाच्या (Of crude oil) किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : या’ जिल्हात ‘जांभळाची’ ऑनलाईन विक्री, शेतकऱ्यांना मिळाला घवघवीत बाजारभाव…

यावर पर्याय उपाय योजना काय असेल?(What would be the alternative solution plan?)

पेट्रोल व डिझेल यांची वाढती मागणी लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी नवीन घोषणा केली आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना मदत होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) चालना मिळेल.

हेही वाचा

रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button