कॅबिनेटच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणार “ही” योजना, पहा योजनेबद्दल सविस्तर..
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शिक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला. देशातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त निर्णय दिसत आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना (PM poshan yojana) आणलेली आहे. जी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरेल. काय आहे ही योजना? व विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
वाचा –
११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य –
या योजनेची अधिक जबाबदारी केंद्र सरकारने (Central Government) घेतलेली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील ११.२ लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण विनामूल्य दिलं जाणार आहे.
वाचा –
रेल्वे संदर्भातील निर्णय –
कॅबिनेट (Cabinet) बैठकीत नीचम-रतलाम रेल्वे मार्गाचे दुहेरी करण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट-कानानुस रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १०८० कोटी इतका खर्च येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करतील असेही सांगितले.
आत्मनिर्भर भारत योजनेवर लक्ष –
आत्मनिर्भर भारत (Self-reliant India) योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रांवर भर दिला गेला आहे. चालू आर्थिक वर्षात २१ सप्टेंबरपर्यंत देशात १८५ बिलियन डॉलरची (Billion dollars) निर्यात झाली. गेल्या सहा महिन्यातील हा सर्वोत्तम आकडा आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा