काजू उत्पादकांसाठी (Cashew growers) एक दिलासादायक बातमी आहे. कोकणातील काजू उत्पादकांना (Cashew growers) दिलासा देण्यासाठी अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने (State Government) संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
काजू उत्पादकांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार –
कोकणातील काजू उत्पादकांना (Cashew growers) दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यामार्फत (District Central Bank) सवलतीच्या दरात कर्ज (loan) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने (State Government) व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कृषी मंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.
वाचा –
अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना –
ओल्या काजूगराला (Cashew) अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन (Cashew production) वाढण्यास मदत होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –