शेळीपालन हा शेतकऱ्यांचा शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळीपालन व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यास मदत होते. वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या वेगवेगळ्या कारणासाठी पाळल्या जातात. दुधासाठी वेगळ्या जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते तर मांसासाठी वेगळ्या जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते. दिवसाला 12 लिटर दुध देणारी शेळीची संकरित जात महाराष्ट्रात आता उपलब्ध होणार आहे.
दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी जास्त दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकार नवनवीन प्रयोग करत आहे . भारतातील गीर गायीचा गोवंश वाढवून ब्राझीलने ज्याप्रमाणे धावलक्रांती केली त्याच प्रमाणे राज्यात 12 लिटर दुध देणारी सानेन शेळी आणून तिच्यावर संशोधन करण्याचे नियोजन सरकार करत आहे. अशी माहिती राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
शेळीला गरिबांची गाय असे म्हणाले जाते. शेळीपालन हा शेतोला योग्य असा जोडधंदा आहे,शिवाय महाराष्ट्र राज्य दुग्धव्यवसायात आघाडीवर असल्याने सरकार या व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी आणि शेळी संवर्धनात भर पाडण्यासाठी आणखी प्रयत्न करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सानेन शेळीवर संशोधन केले जाणार आहे. या शेळीचा भाकड काळ केवळ 105 दिवसांचा आहे. 260 दिवसात हि शेळी 3200 लिटर दुध देते. या जातीची शेळी गावठी शेळ्यांच्या तुलनेत अधिक दूध देते.
WEB TITLE: This goat will give 12 liters of milk per day. Learn more …