केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांच्या किंमतीच्या अनुदानात (Subsidy) मोठा बदल!
Big decision of Central Government, big change in subsidy for fertilizer price!
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी खताच्या किमतींचा मुद्द्यावर मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सादरीकरणाद्वारे खताच्या किंमती (Fertilizer prices) बाबत पडताळणी करण्यात आली. जागतिक पातळीवर होत असलेल्या फॉस्फरिक ऍसिड, अमोनिया (Phosphoric acid, ammonia) इत्यादींच्या वाढत्या किंमतींमुळे खताच्या किंमती वाढत आहेत,अशी चर्चा बैठकीत झाली.
आंतरराष्ट्रीय किंमती (International prices) वाढल्या असूनही शेतकऱ्यांना जुन्या दराने खत मिळायला हवे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहील.
डीएपी(DAP) खतांसाठी सरकारकडून 140% अनुदान घोषित करण्यात आले, शेतकऱ्यांना DAP वर 500 रुपये प्रत्येक गोणीवरुन आता 1200 रुपये प्रती गोणी सबसिडी मिळेल. डीएपीच्या जागतिक बाजारातील किंमती मध्ये वाढ झाली असली तरीही ती जुन्या किंमतीला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षी डीएपीच्या एका बॅग ची किंमत ही 1700 रुपये होती, 500 रुपये सबसिडी मिळून ती बॅग शेतकऱ्यांना 1200 रुपयाला मिळत होती. डीएपी मध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉस्फरिक ऍसिड, अमोनिया (Phosphoric acid, ammonia) या घटकांचे मूल्य (The value of the components) ही जागतिक बाजारपेठांमध्ये वाढले गेले आहे. फॉस्फरिक ऍसिड आणि अमोनिया या घटकांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ( international market) वाढलेले दर हे जवळ जवळ 10 % ने वाढले गेले आहे.
त्यामुळे नवीन दरानुसार डीएपी बॅग ची किंमत ही 2400 रुपये आहे, ती बॅग शेतकऱ्यांना खत कंपन्यांकडून 500 ते 1900 रुपये सबसिडी कमी करून विकली जाते. केंद्र सरकारने(Government of India) देऊ केलेल्या 140 टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना एक बॅग 1200 रुपयांत डीएपी च्या पिशव्या मिळतील.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार राहुरी विद्यापीठाचे एकात्मिक सेंद्रिय खताचे रोल मॉडेल…