फळ शेती

कृषी विभागाचा मोठा निर्णय; आता “या” फळपिकांसाठीही पीकविमा सुरू होणार, अर्ज करण्याची तारीख जाहीर..

आतापर्यंत खरीप, रब्बी हंगामातील पिकांसाठी पीकविमा (Crop insurance) होता. आंबिया बहराकरीता राज्यातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी या 9 फळ पीकांसाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. याकरिता पीक विमा कंपन्या (Crop insurance companies) आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. मृग व आंबिया बहर अशा मिळून चार हेक्टरापर्यंतच्या क्षेत्रावरील विमा (insurance) शेतकऱ्यांना काढता येणार आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

आंबिया बहर म्हणजे काय?

आंबिया बहर हे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.

द्राक्ष फळपिकाला पीक विमा –

आंबिया बहरातील सर्वाधिक विमा (insurance) संरक्षित रक्कम ही द्राक्षासाठी देण्यात आली आहे. ही रक्कम 3 लाख 20 हजार असून या फळपिक उत्पादकाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, मोसंबी 31 ऑक्टोंबर, केळी 31 ऑक्टोंबर, पपई 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, काजू 30 नोव्हेंबर, कोकण आंबा 30 नोव्हेंबर, स्ट्रॉबेरी 14 नोव्हेंबर अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे.

वाचा –

या संकेतस्थळावर घेता येणार सहभाग

केंद्र सरकारने hhhps://pmfby.gov.in या साईट्स चा वापर करण्याचे अवाहन केले आहे तर राज्य सरकारने http://www.maharashtra.gov.in या साईटवर पिक विमा कंपन्या जिल्हे, विमा प्रतिनीधी यांची नावे दिलेली आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button