कृषी बातम्या

मंत्री समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; राज्यात “या” तारखेपासून सुरू होणार उसाचे गाळप, वाचा सविस्तर..

राज्यात ऊस गाळप हंगाम (Sugarcane crushing season) 15 ऑक्टोंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी एफआरपीची (FRP) रक्कम लवकर देण्याचे निश्चित करण्यात आले. केंद्रशासनाने (Central Government) दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी (FRP) निश्चित करण्यासाठी सारख आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट (Study group) स्थापन करण्यात आला होता. या नुसार अहवाल सादर करण्यात येणार आहेत.

राज्यातील (In the state) 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी (FRP) रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून राहिलेल्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत हा निर्णय घेतला. यावर्षीच्या हंगामात 112 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित या गाळप हंगामात केंद्र शासनाने (Central Government) निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे.

हे ही वाचा

अंदाजे 193 साखर कारखाने

2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर असून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे १९३ साखर कारखाने सुरु राहतील असा अंदाज बांधण्यात आला आहे.

राज्यात इथेनॉलची निर्मिती –

112 कारखान्यांमध्ये राज्यात सहकारी आणि खासगी (Cooperative and private in the state) मिळुन इथेनॉल प्रकल्प (Ethanol project) राबविला जातो. या माध्यमातून 206 कोटी लि. इथेनॉलची निर्मिती (Production of ethanol) होते. केंद्र शासनाने शुगर, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला (Production of ethanol) चालना देण्याचे धोरण स्वीकारल्याने 2022 पर्यंत 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचा लक्षांक पूर्णत्वाला जाईल असे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button