ताज्या बातम्या

केंद्र सरकारकडून मोठा निर्णय…! घरगुती एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी निवडता येणार आपल्या पसंतीने गॅस एजन्सी…

Big decision from central government…! Choose the gas agency of your choice to fill the domestic LPG cylinder

घरगुती एलपीजी सिलेंडर रिफिलिंग (LPG cylinder refilling)करण्यासाठी अनेक ग्राहकांनासमस्यांना सामोरे जावे लागते. बडे करून मी घर बदलले व दुसऱ्या घरी राहायला गेले तर सिलेंडर रिफील करण्यासाठी त्रास होतो. यामुळे केंद्र सरकारने करोडो ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या पसंतीचा गॅस डिस्ट्रीब्यूशन सेंटर निवडता (Select your gas distribution center) येणार आहे. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने (By the Ministry of Petroleum and Natural Gas)ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविली आहे. ही सुविधा पुणे(Pune), गुडगाव, चंदिगड,कोईमतूर, रांची या शहरांमध्ये राबवली आहे. ही सेवा या शहरांमध्ये यशस्वी झाल्यास संपूर्ण देशामध्ये राबवण्याचा केंद्राचा इरादा आहे.

हे ही वाचा…. मंत्रिमंडळ निर्णय! धन्याच्या भरडाई करीता देण्यात येणार, “विशेष अनुदान” वाचा सविस्तर बातमी..

[metaslider id=4085 cssclass=””]

देशामध्ये एलपीजी गॅस ग्राहकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांना त्रास होत असतो. गॅस वितरक कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आता खीळ बसणार आहे. ज्या वितरक कंपन्यांची सेवा चांगली (Good service from distribution companies)असेल त्यास कंपन्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता वितरकाकडून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

हे ही वाचा…. IFFCO तर्फे नवीन खतांचे दर जाहीर! वाचा खतांचे नवीन सुधारित दर…

तेल कंपन्यांनी जून महिन्यात जाहीर केलेल्या किमतींमध्ये घरगुती गॅस मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. परंतु केंद्राच्या या निर्णयाने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. घर बदलले किंवा नवीन घर खरेदी केले तर ग्राहकांची होणारी धावपळ यामुळे कमी होणार आहे. वितरक कंपन्यांना सुद्धा यामुळेच चाप बसणार आहे.

हे ही वाचा….

पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याची ‘ही’ आहे अंतिम तारीख पटकन जाणून घ्या; पॅनकार्ड आणि आधार कार्ड कसे जोडाल…

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button