lang="en-US"> Birth Registration | जन्म नोंदणी प्रक्रियेमध्ये मोठा बदल! पालकांना आता मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये द्यावी लागणार ‘ही’ माहिती

Birth Registration | जन्म नोंदणी प्रक्रियेमध्ये मोठा बदल! पालकांना आता मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये द्यावी लागणार ‘ही’ माहिती

Birth Registration | जन्म दाखला हा शाळेत प्रवेशापासून ते अनेक गोष्टींसाठी आवश्यक असणारा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला (Birth Registration) काढण्याकडे पालकांचा भर असतो. याच संदर्भात गृह मंत्रालयाकडून जन्म नोंदणी प्रक्रियेमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

पालकांच्या धर्माची माहिती:
आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. यासाठी जन्म नोंदणी फॉर्ममध्ये एक वेगळा कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे.

नवीन काय?
याआधी जन्माची नोंदणी करताना फॉर्म क्रमांक 1 मध्ये कुटुंबाच्या धर्मासाठी एक कॉलम असायचा. आता त्यात आणखी एक कॉलम जोडण्यात आला आहे ज्यामध्ये मुलाच्या पालकांचा धर्म विचारला जाईल. दत्तक प्रक्रियेसाठीही हा फॉर्म आवश्यक आहे.

डेटाबेस तयार:
प्रत्येक मुलाच्या जन्मावेळी डेटाबेस तयार केला जाईल ज्यामध्ये त्याच्या अनेक गोष्टींची नोंद ठेवली जाईल. हे डिजिटल जन्म प्रमाणपत्र भविष्यात NPR, आधार कार्ड, मतदार यादी, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या कागदपत्रांसाठी उपयोगी ठरेल.

जुन्या आजारांची माहिती:
मृत्यू दाखल्यातही बदल करण्यात आले आहेत. मृत व्यक्तीला कोणता आजार होता का? याची माहिती आता मृत्यू दाखला बनवताना भरावी लागणार आहे. हे बदल कायदेशीररित्या बंधनकारक आहेत आणि पालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.

जन्म नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे:

या बदलांमुळे नागरिकांना काय फायदे मिळतील?
जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांसाठी अर्ज करणे अधिक सोपे होईल.
डेटाबेस अधिक अचूक आणि विश्वासार्ह असल्यामुळे, नागरिकांना सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेणे सोपे होईल.

या बदलांमुळे काही आव्हाने निर्माण होऊ शकतात का?
काही नागरिकांना या बदलांबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात.
डेटा गोळा करण्याच्या आणि त्याचे व्यवस्थापन.

हेही वाचा:

Exit mobile version