ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठीची ‘ही’ अट रद्द; शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत…

E-Crop Inspection | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक (Financial) मदत जाहीर करण्यात आली. परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी (Lifestyle) ई-पीक पाहणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. जी आता तात्पुरती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रद्द केली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत
आता तात्पुरती का होईना ई-पीक पाहणीची अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना (Agricultural Information) दिलासा मिळणार आहे. कारण ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. आता ही अट तात्पुरती हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या ही अडचण दूर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना (Lifestyle) मदत मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या निर्णयाच्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.

का केली अट रद्द?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची तीन दिवस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ई-पीक पहणीची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. ज्याचं कारण म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी करण्यास अडचण निर्माण होत होती. ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले होते.

कोणतेच शेतकरी मदतीपासून राहणार नाही वंचित
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेला कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं देखील विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button