ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

फायदे की बात: शेती करताना करा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर…

Benefits: Use drone technology while farming

.

शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरल्यास शेतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते सध्या मानवी शेतीमध्ये मानव निर्मित ड्रोन चा उपयोग केला जातो. यामुळे शेतीतील कामांमध्ये वेळेची व पैशाची बचत होत आहे. पारंपारिक शेती केल्यामुळे मनुष्यबळ कमतरतेमुळे जास्त वेळ लागतो.
चला तर पाहूया ड्रोन सेन्सर चा उपयोग शेतीसाठी उपयोग

🔹 ड्रोन पिकांची व पशुधनाच्या हालचालीची प्रत्यक्ष माहिती देतो.

🔹 शेती व्यवस्थापनाचा विचार करताना किडी आणि रोग, तण यावर फवारणी आणि खते पसरवण्यासाठी ड्रोन तंत्राचा उपयोग होऊ शकतो.

🔹 ड्रोन चा उपयोग मातीचे परीक्षण मातीचे विश्लेषण करण्यासाठीदेखील केला जातो त्यामुळे मातीमध्ये योग्य पीक आपण घेऊ शकतो. तसेच आणि मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास आपण ती कमतरता दूर करू शकतो.

🔹 हवामान बदलामुळे पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होते पिकांची वाढ व पिकांचे आरोग्य पाहण्याचे काम ड्रोन करू शकतो.

🔹 थर्मल,हाइपर् स्पेक्ट्रल या सेन्सर च्या साह्याने ओलाव्याची कमतरता असलेला भाग शोधून काढू शकतो.

🔹 उभ्या पिकामध्ये पक्ष्यांचा खुप त्रास शेतकऱ्यांना होत असतो त्यावेळी देखील हा ड्रोन शेतकऱ्यांच्या उपयोगी पडून पिकांची राखण करू शकतो,

ड्रोन मध्ये सक्षम सेन्सर लावल्यास पिकाचे उत्तम आरोग्य त्यासाठी आवश्यक असणारे घटक तसेच त्यावर आपल्याला उपाययोजना वेळेच्या आधी करता येईल.त्यामुळे पिकांमध्ये होणारी नुकसान आपल्याला टाळता येऊ शकते. चला तर मग आधुनिकतेची धरु कास शेतीमध्ये करू विकास….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button