Poultry Farming | कुक्कुटपालन अनुदानासाठी अर्ज सुरू, लाभार्थ्यांना मिळणार ‘इतके’ अनुदान
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. यासाठी शासन अनेक योजनाही राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानाचा (Subsidy) लाभ दिला जातो.
Poultry Farming | या भागात सरकारने (Government) अशी योजना सुरू केली आहे. ज्याचा फायदा घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतो. सध्या, कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय हा एक विकसनशील पशुपालन (Animal Husbandry)आधारित उद्योग आहे, ज्याचे भारतीय आर्थिक व्यवसायात. (Financial business) महत्त्वपूर्ण योगदान आहे. आता याच व्यवसायास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची (Poultry Development Group) स्थापना करण्यात आली. कुक्कुटपालन योजनेकरिता 2022-23 करता नवीन अर्ज मागविण्यासाठी सुद्धा सुरुवात झाली आहे.
अनुदान
सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेंतर्गत पूर्ण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे. यापैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. असून, राहीलेले 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा उभा करेल किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभा करु शकेल. ज्यामध्ये 30 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.
वाचा: Wheat export | तुर्की पाठोपाठ यूएईनेही घातली भारताच्या गव्हावर बंदी, नक्की यामागील कारण तरी काय?
अटी व शर्ती
• सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत.
• ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य.
• कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात.
• प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.
• लाभार्थ्यांचे वय 18 ते 60 वर्षांच्या आत असावे.
• 25 चौरस फुटाचे स्वतःची जागा त्याच्या मालकीची असणे गरजेच आहे.
आवश्यक कागदपत्रे
• फोटो आयडी / आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत
• बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
• लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 4
• कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत
• अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इ. कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाची आहेत.
• योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: