Beekeeping | करा मधमाशी पालनचा मधुर धंदा आणि कमवा लाखो रुपयांचा चंदा !
Beekeeping | Do the delicious business of beekeeping and earn millions of rupees!
Beekeeping | विषयाचे नाव वाचून मनात लाडू नक्कीच फुटले असतील, थांबा मंडळी अजून काही आडाखे बांधण्यापूर्वी रहस्य उलगडतो, आज आपण माहिती घेणार आहोत मध उत्पादन व्यवसाय म्हणजे मधुमक्षी पालन, आपण जंगलात झाडावर देवळात उंच जागी आणि आजकाल शहरातही सोसायटी मध्ये मधमाशांची पोळी पाहिली असतील. या पोळ्यांपासून गोडगोड मध तर मिळतो, पण तो काढताना चिडलेल्या माश्यांच्या डंखाचा प्रसादसुद्धा पदरी पडतो. तर या जंगली माशांना चक्क लाकडी पेटयांमध्ये ठेवूनन तुम्ही त्यापासून लाखोंचे उत्पादन मिळवू शकता. त्यासाठी खूप जमिन अथवा
भांडवल याची गरज नाही तर फक्त थोडी कल्पकता आणि मेहनत आवश्यक आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा मध उत्पादक देश असून २०१९-२० मध्ये सुमारे १,१५,० मेट्रिक टन मधाचे उत्पादन झाले आहे. भारतात मधाचे उत्पादन प्रामुख्याने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये केंद्रित आहे. मध उत्पादन आणि प्रक्रिया व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. उत्पादन खर्च, बाजारपेठेची मागणी आणि स्पर्धा अशा विविध घटकांवर या व्यवसायाचे अर्थकारण अवलंबून असते.
वाचा : Beekeeping | शेतकऱ्यांनो महिन्याभरातच लाखोंचा नफा मिळवण्यासाठी मधमाशी पालनाचा करा व्यवसाय; सरकार देतय 80% अनुदान
मधनिर्मिती कशी होते
मधनिर्मिती मध्ये प्रामुख्याने मधमाशा लाकडी पेट्यांमध्ये नेल्या जातात. त्यामध्ये राणीमाशी अंडी घालून कामगार माशांची वसाहत निर्माण करते. या कृत्रिमरित्या तयार केलेल्या लाकडी पेटी मध्ये एक पोळे निर्माण होते. या पेट्यां सहजरित्या एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येतात. फळबागांना फुलोरा आल्यानंतर तिथे या पेट्यां ठेवल्या जातात. मधमाशा फुलांतील मध गोळा करून पेटयांमधील पोळ्यात साठवतात. अशाप्रकारे पंजाबमधील अनेक शेतकरी महाराष्ट्रात सोलापूर विदर्भ भागात पेट्या ठेवतात. मध निर्मितीमध्ये मधमाश्यांच्या पोळ्यांपासून मध गोळा करणे समाविष्ट आहे. त्यानंतर मध अर्क्टरचा वापर करून मधमाशातून मध काढला जातो. त्यानंतर काढलेले मध कोणत्याही अशुद्धी काढून टाकण्यासाठी फिल्टर केले जाते आणि हवाबंद कंटेनरमध्ये साठवले जाते. यासाठी सरकारतर्फे
जिल्हास्तरावर खादी ग्राम उदयोग संस्थेमार्फत तांत्रिक व आर्थिक मदत केली जाते.
भारतात मल्टीफ्लोरा मध, निलगिरीमध, मोहरीचा मध आणि जंगलातील मध असे विविध प्रकारचे मध उपलब्ध आहेत. मधाचा प्रकार आणि गुणवत्तेनुसार मधाची किंमत बदलते. आरोग्यविषयक फायदे आणि ग्राहकांमध्ये वाढत्या जागरुकतेमुळे भारतात मधाची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. सेंद्रिय आणि नैसर्गिक मधाची मागणीही वाढत असून, त्यामुळे बाजारात अधिक भाव मिळू शकतो.
हेही वाचा :
- ऋतुजा चौगले
एम.एस्सी. (मृदा विज्ञान)
Web Title : Beekeeping | Do the delicious business of beekeeping and earn millions of rupees!