सावधान! सोयाबीन विकण्याचं विचार करताय का?; मग आधी हे वाचा…
यंदा सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत असल्याने खुप शेतकरी वर्ग सोयाबीन विकत आहे. परंतु चांगले दर्जेदार बी राखीव ठेवण्याचे आवाहन कृषी परिषद तर्फे करण्यात आले आहे. खरीप हंगामामध्ये कंपनी चे बी घेण्यापेक्षा दर्जेदार बी ठेवावे त्यामुळे अधिक पैसे मोजावे लागणार नाही. कृषी सभापती पंजाब -राव वडाळ यांच्या अध्यक्ष खाली सभेमध्ये सांगण्यात आले.
“सध्या सोयाबीन भाव वाढत आहे ते पाच हजारापर्यंत जाऊन पोहचेल असल्याने शेतकरी बी विकत असल्याने हंगामी कळत दीड पटीने जास्त पैशाने बी खरेदी करावे लागेल. या वर्षी पावसामुळे सोयाबीन खराब झाले आहे. त्यामुळे सोयाबीन च्या किंमत मध्ये वाढ झाली. त्यामुळे शेतकरी बांधवानी नियोजन करून थोडे बी पेरण्यासाठी ठेवावे ” असे आवाहन करण्यात आले आहे. -कृषी अधिकारी, डॉ मुरली इंगळे
Web Title: Be careful! Thinking of selling soybeans ?; Then read this first…