ताज्या बातम्या

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट? अहमदनगर, सांगली, साताऱ्यात सर्वाधिक रुग्ण

Be careful! The third wave of corona in Maharashtra? Most patients in Ahmednagar, Sangli, Satara

गेल्या आठवड्याभरापासून देशातला कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय.

महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात 6 हजार 600 नव्या रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातही काही जिल्हे अ‌ॅलर्ट झाले असल्याचं समोर आलंय त्यामध्ये अहमदनगर, सांगली, सातारा, बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव (Outbreak) कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसत आहे.

अहमदनगरमध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ.. (Rapid growth of patients in Ahmednagar)

अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, गेल्या पाच दिवसांमध्ये सरासरी एक हजार रुग्ण वाढत आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध (Strict restrictions) लावण्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी( Collector) दुपारी चारनंतर सर्व दुकाने,कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात 843 नवे रुग्ण..

सांगली जिल्ह्यातही कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दिवसभरात 843 जणांना कोरोनाचे निदान झाले, तर 886 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील 18 जणांचा मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यात 675 नवे रुग्ण..

सातारा जिल्ह्यातील 675 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 5.8 इतका आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 11,351 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

त्यामुळे अहमदनगर, सांगली, सातारासह, पुणे बारामती, इंदापूर, लातूर या जिल्ह्यातील रुग्ण नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, अशीच रुग्ण वाढ होत राहिल्यास तिसरी लाटे लवकर येणे अटळ आहे.

महाराष्ट्रात प्रथमच ‘झिका व्हायरस’ सापडला रुग्ण! (Zika virus found in Maharashtra for the first time!)

कोरोनाची (corona) लाट ओसरत नाही तेच पुण्यात (pune) झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यात एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची (zika virus) लागण झाली आहे. मात्र, उपचाराअंती ही महिला बरी झाली आहे. अशी माहिती पुणे आरोग्य विभागाने दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button