ताज्या बातम्या

सावधान! परत आली राज्यातील नवीन नियमावली, या नियमावली उल्लंघन केल्यास होणार इतके रुपये दंड !

Be careful! The new rules of the state came back, if you violate these rules, you will be fined so much!

“हम फिर से लौट आयेंगे”, म्हणत राज्य सरकारने पुन्हा नवीन यादी जाहीर केली ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा नवीन यादी जाहीर केली आहे. व या नियमावलीचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

कोरोनाला थोपवण्यासाठी “ब्रेक द चेन” या अंतर्गत नवीन नियमावली जारी केली आहे. कारण नसताना बाहेर फिरू नका असे ही विनंती जनतेला केली आहे. तूर्तास तरी लॉकडाऊन चा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री आज घटनास्थळी भेट देणार आहेत, तेथील स्थितीचा आढावा घेतील तसेच रुग्णांची यांची विचारपूस करून त्यानंतर संबोधन करतील, अशी माहिती मिळत आहे. मात्र, राज्यात आजपासून 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार आहेत. आधीच्या नियमांहून हे नियम अधिक कडक असणार आहेत.

*काय आहे चालू?

👉लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॉलमध्ये 2 तास कार्यक्रम

👉आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी

👉मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने

👉सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु

👉खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू

👉लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट मिळेल

👉खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच

*या नियमावली चे उल्लंघन झाल्यास दंड होणार आहे, तसेच लग्न समारंभ मध्ये उल्लंघन झाल्यास ५०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

हे ही वाचा:
१)सावधान !! फोन पे ( Phone Pay ),गुगल पे, (Google pay) धारकांनो एका “क्लिकमुळे” होऊ शकेल तुमचा खिसा खाली…
२)जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा कसा उपयोग करावा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button