सावधान !! फोन पे ( Phone Pay ),गुगल पे, (Google pay) धारकांनो एका “क्लिकमुळे” होऊ शकेल तुमचा खिसा खाली…
Be careful !! Phone Pay, Google Pay, (Google pay) holders can get your pocket down with a single "click
आज काल डिजिटल पेमेंट कडे कल जास्त वाढला आहे त्यामध्ये गुगल पे ( Google Pay), ऍमेझॉन पे(Amazon pay) ,फोन पे (phone pay), यासारखे यूपीआय (UPI) एप्लीकेशनचा वापर केला जातो . सध्या कोरोनाच्या काळामध्ये अप्लिकेशन चा वापर मोठ्या प्रमाणात झाला परंतु हे ॲप्लिकेशनचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
आज-काल सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एखादा खोटा कॉल येईल व आपले खाते रिकामे होईल आपल्याला काही लक्षात येण्याअगोदर आपली फसवणूक देखील झाली असेल, आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. हा अलर्ट महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी जारी केला आहे.
विशेषता फोन पे (Phone Pay) वापर करताना हा इशारा दिला आहे. स्वतःला फोन पे चे कर्मचारी सांगून व्यक्तिगत माहिती घेतात, आपल्याला या कॉल वर शंका देखील येत नाही. कॉलर स्वतःला फोन पे चा कर्मचारी असल्याचे सांगतो आपल्याला खात्री देतो आणि काही क्षणांमध्ये आपल्या खात्यातून पैसे गायब देखील होतात.
याबाबत महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहेकाही प्रकरणांमध्ये असे दिसून आले की लोकांनी एक क्लिक करताच त्यांच्या खात्यातील पैसे गायब झाले आहे. हा एक क्लिक गुन्हेगारांपर्यंत आपली बँकेतील सगळी माहिती प्रोव्हाइड करतो व क्षणार्धात पैसे गायब होतात.
या पासून सावधान कसे राहाल ..
👉फोन पे युजर्स संदेश काळजीपूर्वक वाचा.
👉कॅशबॅक मेसेज वर क्लिक करू नका.
👉क्रिमिनल नेहमी रिक्वेस्ट मनी पैशाचा संदेश पाठवतात.
👉फोनवर बोलत असताना कधी एप्लीकेशन ऍक्टिव्ह करू नका.
👉फोनवर बोलताना व्यक्तिगत माहिती देऊ नका.
👉कोणती कंपनी कॅशबॅक ऑफर साठी कॉल करत नाही.
👉 सावधान रहा! पैसे मिळवण्याच्या हेतूने आपली फसवणूक केली जाईल.