सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”…
Be careful! "It could happen in minutes, the corona threat"
देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे,त्यामुळे साहजिकच कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. दिल्लीसह महाराष्ट्र देखील कोरोनाच्या प्रमाण वाढीचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय भीषण आहे.
महाराष्ट्रात तर दररोज कोरोना बाधितांचे नवनवीन विक्रम पाहण्यास मिळत आहेत. अनेक उपाययोजना सुरू असताना कोरोना काही केल्या आटोक्यात येताना दिसत नाही,त्याचा वेग वाढत चालला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल पर्यंत सरकारने राज्यात कडक संचारबंदी देखील लागू केली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या साठ सेकंद ( एक मिनिट ) संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच आता 70 ते 80 टक्के पर्यंत लागल होत आहे. म्हणजेच पहिला लाटेपेक्षा दुसरी लाटेचा वेग हा दुप्पट असल्याचा जाणवतो. कोरोना बाधितांचे संपर्कात आल्यास अवघ्या काही मिनिटातच तुम्हाला कोणाची लागण होऊ शकते.
पहिल्या लाटीच्या वेळेस कोरोना हा वेग रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर दहा मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका असायचा, मात्र ही वेळ मिनिटावर येऊन ठेपली आहे. असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले, आधीच्या तुलनेत हा विषाणू अतिशय वेगाने हातपाय पसरत आहे. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.