कृषी बातम्या

सावधान! द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक वाचा सविस्तर बातमी…

Be careful! Fraudulent Billions of Grape Growers Read More

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील शेतकऱ्यांची कोट्यवधींची (Billions) फसवणूक (Cheating) झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड सह इतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची द्राक्षं निर्यातीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. द्राक्ष निर्यात करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पाडवा ‘अ‌ॅग्रो सोल्युशन फर्म’ कंपनीच्या 7 संशयित आरोपींना अटक नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून (From the rural police) करण्यात आली आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

पाडवा अ‌ॅग्रो सोल्युशन फर्म ( Padva Agro Solution Firm) या कंपनीने शेतकऱ्यांकडून द्राक्ष निर्यात करणार असल्याचे म्हणून द्राक्ष घेतले, मात्र तीन चार महिने उलटल्यानंतरही या कंपनीने जवळजवळ अडीच ते तीन कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नव्हते. या प्रकरणामध्ये जवळपास पन्नास ते साठ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील,दिंडोरी,त्रंबकेश्वर, निफाड,चांदवड या तालुक्यांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून कंपनीने शेतकऱ्यांकडून एक्स्पोर्ट (Export) द्राक्ष खरेदी केली,मात्र त्यांना पैसे दिलेच नाही.जे चेक दिले गेले, त्या अकाउंटवर (On account) पैसे नसल्याचं समोर आलं, अडीच ते तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

पोस्ट ऑफिस मध्ये फसवणूक झाल्यास ‘येथे’ करा तक्रार…

ऑनलाइन शॉपिंग खरेदी करताना, घ्या ‘अशी’ काळजी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button