इतर

सतर्क रहा! “या” गावातील शेतकऱ्यांची चार लाख रुपयांची फसवणूक…

Be careful! Fraud of Rs 4 lakh to farmers in "Ya" village

राहुरी जिल्हा नगर येथील कुरणवाडी येथे दोन शेतकऱ्यांना शेतातील टरबूज एका व्यापाऱ्यांनी खरेदी केले. व त्या बदल्यात या शेतकऱ्यांना चार लाख सात हजार 500 रुपयांचा धनादेश देण्यात आला. या शेतकऱ्यांनी तो धनादेश बँकेत वटण्याकरता दिला असता हे चेक बँक मध्ये वटले नाहीत.

कुरणवाडी येथील दोन शेतकऱ्यांची एका व्यापाऱ्याने फसवणूक करून चक्क चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार शेतातील साठ टन तसेच दुसऱ्या फिर्यादीच्या क्षेत्रातील साडेआठ टन टरबूज खरेदी केले होते त्या बदल्यात त्यांना दोन बँकेचे धनादेश देण्यात आले मात्र दोन्ही बँकेत पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांशी संपर्क साधल्यास मी तुमचे पैसे देतो असे सांगून वेळ काढूपणा केला. वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाहीत त्यामुळे फिर्यादीने व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करताहेत.

हे ही वाचा:

1) नारळ पिण्याची हे आहेत फायदे जाणून घ्या
2) हरभरा वाढीचे संकेत! पहा किती रुपये पर्यंत जाऊ शकतो हरभरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button