इतर

सावधान! गुगल वर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा पश्चाताप करावा लागेल..

Be careful! Do not search these items on Google by mistake or you will regret it

देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये वर्क फ्रॉम होम (Work from home) सध्या चालू आहे, त्यामुळे इंटरनेट चाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे असे असले तरी याच काळामध्ये सायबर गुन्हेगारी (Cybercrime) म्हणजेच इंटरनेटद्वारे फसवणूक केली जाण्याचे प्रकरणे मोठ्या प्रमाणात आले आहेत तसेच अनेक सोशल मीडिया हॅकर्स हॅक करत आहेत,

अनेकदा आपण बे सावधपणे इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च करायला जातो परंतू त्या गोष्टी आपल्याला नुकसानदायी ठरू शकतात कारण हॅकर्स या सर्व गोष्टींकडे डोळे लावून बसलेले असतात. आज अशा गोष्टींपासून सावधान राहण्यासाठी आपण काय करता येईल हे पाहू: म्हणजेच हे सर्च करणे टाळा

हे ही वाचा: दौंड मधल्या महिलांनी लढवली शक्कल गोवऱ्या विकल्या ऑनलाईन वाचा यांची यशोगाथा

बँकेची माहिती (Bank information)
या काळामध्ये ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे, ऑनलाइन फ्रॉड(Online frod)करणारेही हॅकर्स बँके सारखेच युआरएल कोड निर्माण करतात. जेव्हा आपण बँकेचे नाव टाकतो त्या वेळेस बरोबर आपण हॅकर्स चार जाळ्यात सापडतो. त्यामुळे बँकेची माहिती गुगल वर सर्च करणे टाळावे बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट(.Official website) वर जाऊन माहिती घ्यावी.

औषध उपचार(Drug treatment)

बरेच द होम रेमेडीज करण्याकरता आपण गुगल वर घरगुती उपाय योजना पाहत असतो. यामुळेच जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. कोणत्याही आजाराबाबत गुगल वरून माहिती घेणे हे योग्य नाही गुगल वरील कोणत्याही वेबसाइट वर विश्वास ठेवून औषध उपचार करणे हे अत्यंत चुकीचे आहे. गुगल सर्च इंजिन आहे डॉक्टर नव्हे

योजनांची माहिती (Scheme information)

हे ही वाचा: शेतकरी कुटुंबातील सुनेची जिद्दीची कहाणी स्वकष्टाने मारली ” या ” पदावर बाजी..*_

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक योजना राबवीत आहेत. केंद्र सरकार सुंदर डिजिटल इंडिया चा नारा देत आहे. त्यामुळे कोणतेही सरकारी योजनेची माहिती ही सरकारी वेबसाईट वरूनच घ्या ही माहिती सर्व भाषांमध्ये देखील उपलब्ध असते व सहज सोपी असते.सायबर क्रिमिनल फ्रॉड सरकारी वेबसाइट सारख्याच दुसऱ्या साईट तयार करतात. अशावेळेस आपण सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

कस्टमर केअर(Customer care)

हे ही वाचा: असे करा ,”कांदा” पिकाचे व्यवस्थापन…

बरचे कोणत्याही सुविधा मध्ये अडचण निर्माण झाल्यास आपण त्या वस्तूच्या कस्टमर केअर ला कॉन्टॅक्ट करण्यासाठी गुगल वर सर्च करतो परंतु हॅकर्स नकली वेबसाईट काढून आपली सगळी माहिती काढून घेतात. व आपल्याला कळतही नाही त्यापासून आपले मोठे नुकसान झाले असते.


हे ही वाचा: तुम्हाला मिळाले आहे का प्रॉपर्टी कार्ड काय आहेत प्रॉपर्टी कार्डचे फायदे वाचा सविस्तर पणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button