धुळे : खताचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) मोठ्या प्रमाणावर खतांकरिता अनुदान(Grants for fertilizers) देण्यात आले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या नावाने अनेक व्यापारी हे अनुदान लुटताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताची बीले(Fertilizer bills) करताना, बिले तपासून पाहावीत व आपली फसवणूक (Cheating) होत नाहीना याकडे लक्ष द्यावे.
धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने, एक पिशवी खताची घेतली असता, खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याच्या मोबाईल वर मेसेज आला, त्याची एक पिशवी घेतली असताना देखील त्याच्या नावे विक्रेत्याने 45 पिशव्या खरेदी केले आहेत असे दाखवले होते, या 45 बॅगची बिलाची रक्कम ही 43 हजार 590 इतकी होती, तर यावर एकूण 21 हजार 720 रुपयांचं अनुदान मिळाल्याचा मजकूर होता, हे पाहून तो शेतकरी थक्क झाला.
राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असतील, याकरता शेतकऱ्यांनी आपल्याला मिळणारे बिले तपासून पहा, आपल्या नावावर विक्रेते खते खरेदीत करत नाहीत ना याचा तपास लावा, कदाचित तुमच्या नावावर बनावट बिले करून कोट्यवधी रुपयाचे अनुदान हे विक्रेते लाटत आहेत. त्याकरिता वेळी सावधान व्हा, हे खत विक्रेते तुमच्या नावे बिले करून सरकारला चुना लावण्याचे काम करत आहे. काही गडबड वाटल्यास कृषी अधिकारी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
1)महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…
2)मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?