योजना
Milk Cow| दुधाळ जनावरांची गट पुरवठा योजना: अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि जमातींसाठी आर्थिक सक्षमतेचा मार्ग
Milk Cow| बारामती: समाजातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी आणि अनसूचित जाती, नवबौद्ध (Neo-Buddhist) आणि जमातींना सक्षम बनवण्यासाठी, शासन विविध योजना राबवत आहे. यामध्येच दुधाळ जनावरांची गट पुरवठा योजना महत्त्वपूर्ण आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई किंवा म्हशी खरेदीसाठी 75% अनुदान दिले जाते.
योजनेचे फायदे:
- ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते.
- दुधाचे उत्पादन वाढन त्याद्वारे उत्पन्न वाढते.
- पशुधन विकासामुळे शेतीला पूरक व्यवसाय (Business) मिळतो.
- कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
योजनेसाठी पात्रता:
- अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
- 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले लहान आणि अत्यंत लहान शेतकरी पात्र आहेत.
- रोजगार आणि स्वयरोजगार केंद्रात नोंदणीकृत बेरोजगार आणि महिला बचत गटातील सदस्यांना प्राधान्य (preference) दिले जाते.
वाचा:KVP| पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना: दीर्घकालीन बचतीसाठी उत्तम पर्याय|
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया:
- इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आह.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करते.
- निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते.
- लाभार्थ्यांनी एका महिन्यात अनुदानाचा हिस्सा जमा करणे आवश्यक आहे किंवा बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे.
- तालुक्यातील पशुधन विकास (Development) अधिकारी दुधाळ जनावरे खरेदी करतील.
योजनेचा यशस्वी अंमलबजावणी:
- 2023-24 मध्ये, या योजनेसाठी ₹2 कोटी 56 लाख 19 हजार रुपयांची तरतूद (provision) करण्यात आली आहे.
- 2022-23 मध्ये, या यजनेद्वारे 394 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.