बापरे, या शेतकऱ्यांनी तब्बल 1000 किलोचा भोपळा शेतात पिकवला; थेट जागतिक विक्रमात नोंद..
शेतीमध्ये मेहनत करून हवे तसे फळ मिळवता येते. पाहिजे तसं पाहिजे तेवढं उत्पन्न घेता येतं. या दोन शेतकऱ्यांनी शेतात कमाल केली आहे. त्यांच्या शेतात तब्बल 2,164 पौंड म्हणजे 1000 किलोचा भोपळा पिकवला आहे. याची नोंद थेट जागतिक विक्रमात झाली आहे. याविषयी सविस्तर पाहुया..
वाचा –
1000 किलोचा पिकवला भोपळा –
या विशालकाय भोपळ्याचे उत्पादन घेत जागतिक भाजी उत्पादन स्पर्धेत या भोपळ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे हा विक्रम ठरला आहे. टॉड आणि डोना स्किनर हे दोन शेतकरी 30 वर्षांपासून त्यांच्या शेतीत भोपळ्याचे उत्पादन करत आहेत. यंदा काहीतरी वेगळे करण्याचे ठरवून त्यांनी विशालकाय भोपळा पिकवण्याचे ठरवले. ज्यावेळी याचे उत्पादन आले आणि हा भोपळा तब्बल 1000 किलोचा असल्याचे समजले त्यावेळी त्यांना आनंद झाला.
वाचा –
जागतिक विक्रमात नोंद –
डबलीनमध्ये होणाऱ्या ओकलैंड नर्सरी नेशनल स्क्वैश वेट-ऑफ स्पर्धेत हा विक्रम नोंदवणार अशी अपेक्षा होती. ती सत्यात उतरल्याने या दोन शेतकऱ्यांनी सांगितले. या भोपळ्याचे उत्पादन घेताना याचे वजन इतर भोपळ्यांपेक्षा जास्त असेल याचा अंदाज होता. पण याची विक्रमात नोंद होईल, असे वाटले नव्हते. याची जागतिक विक्रमात नोंद झाल्याने केलेल्या मेहनतीला चांगले फळ आले आहे, असे त्यांनी सांगितले. आता जगातील सर्वात विशालकाय भोपळा पिकवण्याचा विक्रम या शेतकऱ्यांचा नावावर झाला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा