बापरे, उपजिल्हाधिकाऱ्या कडे थेट गांजा शेतीसाठी मागणी; वाचा काय झाला निर्णय..
Bapare, demand for cannabis cultivation directly to the Deputy Collector; Read what happened.
सध्याचे बाजारभाव (Market price) पाहिले तर आपल्याला दिसून येते की शेतकरी कित्ती मोठ्या तोट्यात आहे. शेतमालाच्या दराने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येते त्याचा शेतामधील खत पाण्याचा (Fertilizer) देखील खर्च निघत नाही तर शेतात घाम गाळून केलेल्या मेहनतीचा पैसा मिळणं तर लांबची गोष्ट. शेतकरी हवालदिल होऊन थेट जिल्हाधिकाऱ्या भेटीला गेला. सविस्तरपणे पाहूया कोणकोणत्या मागण्या केल्या.
गांजा शेतीसाठी उपजिल्हाधिकाऱ्याकडे मागणी –
अनिल पाटील गाव शिरापूर ता.माहोळ सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या या शेतकऱ्यांने, सोलापूरच्या उपजिल्हाधिकाऱ्याला (Deputy Collector) भेटून गांजा शेती लागवडीसाठी मागणी केली आहे. बाकी शेतकऱ्यांचा विचार करून अनिल पाटील यांनी शेतकरी बांधवांना प्रति दोन एकर गांजा लागवडीसाठी (Cannabis cultivation) मागणी केली येणाऱ्या चालू हंगामात पीक घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्याला भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड मधील महिलांनी लढवली शक्कल! गोवऱ्या विकल्या थेट ऑनलाईनच; वाचा व ऐका त्यांच्या यशाची गाथा…
शेतीला हमीभाव अन्यथा गांजा शेती परवानगीची मागणी –
शेतकऱ्याच्या मालाची किंमत खुप कमी मोजली जात असल्याने शेतकऱ्यांना कवडीचाही नफा (Profit) होत नाही. या अनुसरून अनिल यांनी म्हंटले आहे की आमच्या मालाला चांगला हमीभाव मिळवून द्या अन्यथा आम्हाला गांजा शेतीसाठी परवानगी द्या.
सध्याचे शेतीच्या मालाचे हमीभाव (Guarantee of agricultural commodities) तसेच भाज्यापाल्यांचे बाजार भाव पाहता शेतकरी (Farmers) हवालदिल झालेला दिसून येत आहे. त्याच्या मालाला योग्य हमीभाव दिला जात नसल्याने उत्पादन (Production) घेणार तरी कोणत्या पिकामध्ये हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला आहे. आणि जी शेती घेतली जाईल त्यामधून फायदा होण्याची शक्यता खूप कमी असल्याने शेतकऱ्यांनी पोटापाण्यासाठी व नफ्यासाठी गांजा शेतीसाठीची (Cannabis farming) मागणी केलेली आहे. शेतीच्या मालाला हमीभाव वाढवतील की गांजा शेतीला परवानगी देतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :