बापरे, ऐका द्राक्षांचा घड 8 लाखांहून अधिक रुपयांना विकला गेला; या जातीच्या द्राक्षांचे उत्पादन कुठे घेतलं जातं? पहा सविस्तर..
सध्या महागाईचा काळ आहे, पण एखादी फळे (Fruits) महाग किती असू शकतात? याचा अंदाज सुद्धा तुम्ही कधी बांधला नसेल. अशाच ऐका फळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या फळाचे नाव आहे द्राक्ष (Grapes). द्राक्षांचा (Grapes) एक घड तब्बल 25 ते 30 हजारांना विकला गेला. या फळाचा व्यवहार तसेच फळाबद्दल सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
हा द्राक्ष रोमन नावाने ओळखला जातो –
द्राक्षांच्या (Grapes) चवीसमोर आपल्याकडे खाल्ली जातात ती हिरवी आणि काळी द्राक्षं (Grapes) काहीच नाहीत. खास करुन जापानमध्ये या द्राक्षांचं उत्पादन (Grape production) घेतलं जातं. या द्राक्षांचा आकार हा सामान्य द्राक्षांपेक्षा फारच मोठा असतो. तसेच ही द्राक्षं (Grapes) चवीला फार गोड असतात. विशेष म्हणजे जापानमध्ये सुद्धा इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. ही द्राक्षं (Grapes) खास असल्यामुळे दरही तेवढाच खास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही द्राक्षं (Grapes) बाजारामध्ये विकत मिळत नाहीत. त्यांचा विशिष्ट पद्धतीने लिलाव केला जातो असे बिझनेस इन्सायडरच्या वृत्तात म्हटलं आहे.
वाचा –
द्राक्षांचा लिलाव –
सामान्यपणे एक हजार डॉलर (USD) म्हणजे ७० हजारांपर्यंत वगैरे या द्राक्षांचा मोठा घड विकत घेता येतो. पण २०२० साली एका लिलावामध्ये या द्राक्षांच्या एका घडासाठी तब्बल १२ हजार अमेरिकन डॉलर (American USD) म्हणजेच जवळजवळ ८.८ लाख रुपयांची बोली लावण्यात आलेली. अनेकदा या घडांमधील द्राक्षांची संख्या ठरवत असतात. या सर्वांचा हिशोब लावल्यास काही घडांना मिळणाऱ्या दरानुसार एका द्राक्षाची किंमत (price of grapes) ही ३० हजार रुपयांपर्यंतही असते.
इतर फळांच्या किमतीने सुद्धा केले लिमिट क्रॉस-
फक्त द्राक्षंचं (Grapes) नाही तर जपानमध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या सर्वच फळांच्या किंमती (Fruit prices) महाग आहेत. मागील काही वर्षांमध्ये जगातील सर्वात महागाड्या आंब्यांमध्ये समावेश झालेला जपानी मियाजाकी आंबा (Japanese Miyazaki Mango) हे अशाच एका महागड्या फळाचं उदाहरण आहे. लाल रंगाचा हा अंबा प्रती किलो अडीच लाख रुपयांना (Two and a half lakh rupees) विकला जातो. जपानमधील चौकोनी आकाराची कलिंगड (Kalingad) सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहेत. या कलिंगडांची किंमत ६० हजार रुपयांपर्यंत असते. याच देशात उत्पादन घेतली जाणारी सेंबेकिया स्ट्रॉबेरी (Sembakia strawberry) एका डझनला सहा हजार रुपये दराने विकली जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा