ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Strike | मोठी बातमी ! देशभरातली बँका राहणार 6 दिवस बंद ; जाणून घ्या बंद मागील कारण सविस्तर …

Bank Strike | Big news! Banks across the country will remain closed for 6 days; Know the reason behind closure in detail...

Bank Strike | ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने (AIBEA) 4 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपाची हाक दिली आहे. यामुळे देशभरातल्या विविध (Bank Strike ) बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

AIBEA ने तीन मागण्या केल्या आहेत. यातल्या पहिली मागणी सगळ्या बँकांमध्ये अवॉर्ड स्टाफची पर्याप्त भरती करणं, दुसरी मागणी बँकांमध्ये स्थायी नोकऱ्यांची आऊटसोर्सिंग बंद करणं आणि तिसरी मागणी बँकिंग क्षेत्रातील कामगारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करणं ही आहे.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी पंजाब नॅशनल बँक, एसबीआय आणि पंजाब ऍण्ड सिंध बँक, 5 डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया, 6 डिसेंबर रोजी कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, 7 डिसेंबर रोजी इंडियन बँक, युको बँक, 8 डिसेंबर रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि 11 डिसेंबर रोजी खासगी बँका संपावर जाणार आहेत.

वाचा : Diwali Lights | दिवाळीनंतर दिव्यांचे काय करावे? असे करा घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल! जाणून घ्या सविस्तर …

डिसेंबर महिन्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे देशभरातली बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना पैसे काढणे, पैसे जमा करणे, चेक वगैरे चालवणे यासारख्या कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

AIBEA ने सरकार आणि बँकिंग क्षेत्रातील व्यवस्थापकीय संघटनांना या मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा :

Web Title : Bank Employees On Strike | Big news! Banks across the country will remain closed for 6 days; Know the reason behind closure in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button