आर्थिक

Bank License Cancelled | महाराष्ट्रतील “हे” बँक झाली रद्द ! ५ लाखांपर्यंत जमा असलेल्या ग्राहकांचे पैसे परत मिळणार, वाचा सविस्तर बातमी…

Bank License Cancelled "This" bank in Maharashtra was cancelled! Customers who have deposits up to 5 lakhs will get their money back, read the detailed news…

Bank License Cancelled | इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याचे कारण देत रिझर्व बँकेने ही कारवाई केली आहे.

आरबीआयने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद (Bank License Cancelled) करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ठेवी स्वीकारणे, पैसे काढणे, कर्ज देणे, व्यवहार करणे इत्यादी सर्व प्रकारचे व्यवहार बंद आहेत.

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याने बँकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल, असे आरबीआयने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशाचा संदर्भात देखील आरबीआयने पत्रकात माहिती दिली आहे. ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील.

या कारवाईमुळे इचलकरंजीतील शेकडो ग्राहकांना आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Web Title : Bank License Cancelled “This” bank in Maharashtra was cancelled! Customers who have deposits up to 5 lakhs will get their money back, read the detailed news…

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button