नोव्हेंबर महिन्यात बँकेला सुट्टयाच सुट्टया; बँकेतील कर्मचाऱ्यांची - मी E-शेतकरी
इतर

Bank Holiday |नोव्हेंबर महिन्यात बँकेला सुट्टयाच सुट्टया; बँकेतील कर्मचाऱ्यांची दुहेरी दिवाळी

Bank Holiday : सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात काही सण आले आहेत. या सणांमुळे उद्याच्या दिवशी अर्थातच पुढील नोव्हेंबर महिन्यात बँकेच्या सुट्टयांची यादी बघणे जरुरीचे (information)आहे. पुढील महिन्यात बँकेतील कर्मचाऱ्यांची सुट्टयांमुळे दुहेरी दिवाळी साजरी होणार आहे. कारण या महिन्यात दुसरा शनिवार, चौथा शनिवार, दर रविवार, गुरुनानक जयंतीमुळे अशा एकूण 10 दिवस कामकाजाची सुट्टी राहणार आहे. या कालावधीत ग्राहक एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2022 मध्ये 10 दिवस बँका बंद राहणार असल्याचे सांगितले. आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरमधून ही माहिती समोर आली आहे. 30 दिवसांच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सणवार आहेत, ज्यामुळे बँकांना सुट्टया असणार (information)आहेत.

वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…

नोव्हेंबर महिन्यात साजरे होणार हे सण; कोणत्या राज्यात बँकांना असणार सुट्टया :

नोव्हेंबर महिन्यात गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा, कनकदास जयंती, वांग्ला फेस्टिव्हल, कन्नड राज्योत्सव, कुट फेस्टिव्हल आणि सेंग कुत्सनेम सारखे सण आहेत. यापैकी बहुतांश सण प्रादेशिक आहेत. त्यामुळे काही प्रादेशिक बँका या दिवशी सुरू राहणार (information)आहेत. हे सण ज्या राज्यात आहेत त्या सणानुसार त्या त्या राज्यातील बँका बंद राहतील.

वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

दर महिन्याच्या सुट्टया किती? :

रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर दर महिन्याला किती सुट्टया आहेत याची यादी उपल केली जाते. यावरून आपल्याला येत्या महिन्यात किती सुट्टया आहेत हे(information) कळतं. अशाचप्रकारे नोव्हेंबर महिन्यात 10 सुट्टया असल्याचे त्या यादीमुळे समजले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button