ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Holiday | ऑक्टोबर महिन्यातील उर्वरित 12 दिवसांमध्ये तब्बल 9 दिवस बँका बंद ; बाहेर पडण्यापूर्वी वाचा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday | As many as 9 days of bank closure in the remaining 12 days of the month of October; Read the list of holidays before going out.

Bank Holiday | ऑक्टोबर महिन्यातील अर्ध्याहून अधिक महिना सरला आहे. उर्वरित 12 दिवसांमध्ये बँकेसंदर्भातील काही काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

या महिन्यातील शेवटच्या 15 दिवसांपैकी 8 दिवस बँका बंद राहणार आहेत.

वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्ट्या

भारतामधील बँकांची बँक म्हणजेच केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. या यादीमध्ये यंदाच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या (Bank Holiday) सुट्टीसहीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणकोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणासाठी सुट्ट्या आहेत याची यादीच देण्यात आली आहे. देशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध कारणांसाठी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ वर्षातील उर्वरित पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू

ऑनलाइन व्यवहार सुरु

अर्थात या दिवसांमध्ये ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना व्यवहार करता येतील. किंवा बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन करावी लागणारी कामं वगळतं सर्वच कामं करता येतील. मात्र या उर्वरित महिन्यात नेमक्या कधी आणि कशामुळे तसेच कुठे बँका बंद असणार आहेत पाहूयात…

कधी, कुठे आणि का आहेत सुट्ट्या पाहा यादी…

  • 21 ऑक्टोबर (शनिवार) – दु्र्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल.
  • 23 ऑक्टोबर (सोमवार) – महानवमी, आयुध पूजा, दुर्गा पूजा, विजय दशमीनिमित्त त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड आणि बिहारमध्ये बँका बंद असतील.
  • 24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजेनिमित्त आंध्र प्रदेश, मणिपूर सोडून सर्व राज्यांमधील बँकांचे व्यवहार बंद असतील. महाराष्ट्रातही या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
  • 25 ऑक्टोबर (बुधवार) – दूर्गा पूजा (दसैन) या दिवशी सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
  • 26 ऑक्टोबर (गुरुवार) – दूर्गा पूजा (दसैन)/ विलय दिवस – या दिवशी सिक्कीम, जम्मू-काश्मीरमधील बँका बंद असतील.
  • 27 ऑक्टोबर (शुक्रवार) – दूर्गा पूजा (दसैन) सिक्कीममध्ये बँका बंद असतील.
  • 28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा- बंगालमध्ये बँका बंद असतील.
  • 29 ऑक्टोबर (रविवार) – सर्व बँका आठवडी सुट्टीनिमित्त बंद असतील.
  • 31 ऑक्टोबर (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील सर्व बँका महिन्याच्या शेवटच्या दिवशी बंद असतील.

म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंतच्या 12 दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल 9 दिवस बँका बंद असणार आहे.

बँकेसंदर्भातील कामे आठवडाभरात पूर्ण करा

बँकेसंदर्भातील कोणतीही कामे असतील तर ती आठवडाभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण पुढील 12 दिवसांमध्ये बँका बंद असतील. या काळात तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन कोणतीही कामे करता येणार नाहीत.

हेही वाचा :

Web Title : Bank Holiday | As many as 9 days of bank closure in the remaining 12 days of the month of October; Read the list of holidays before going out.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button