lang="en-US"> Ban Apps | 'या' १४ मेसेंजर ॲप्स वर सरकारने घातली बंदी..

Ban Apps | ‘या’ १४ मेसेंजर ॲप्सचा दहशतवाद्यांकडून वापर; सरकारने घातली बंदी; तपासा आपला मोबाईल…

Ban Apps | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी १४ मेसेंजर ॲपवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. या १४ ॲपचा वापर पाकिस्तानातील दहशतवादी करत आहेत. या ॲपद्वारे जम्मू – काश्मीरमधील सहकाऱ्यांशी दहशतवादी मेसेजद्वारे बातचीत करताना दिसत आहेत. हे देशाला कुठे तरी घातक असल्याने मोदींनी १४ ॲप्स ब्लॉक केले. ते १४ ॲप्स पुढीलप्रमाणे

१४ ॲप्स नरेंद्र मोदींच्या आदेशावर ब्लॉक


Threema चा समावेश आहे. आता सरकारने हे १४ अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत. यात सर्वात अधिकाधिक IMO हे ॲप चर्चेत आणि वापरात आले आहे. ज्यावेळेस व्हॉट्स ॲपचे व्हिडिओ कॉल नव्हते तेव्हापासून IMO चर्चेत आहे. या ॲपची खासियत म्हणजे कमी रॅम आणि कमी स्टोरेज असलेल्या फोनवरही सहजतेने कार्य करते. एकाच वेळी २० लोकं व्हिडीओ कॉल करू शकतात.

दरम्यान, हे ॲप्स डेव्हलपर्स हे भारतातली नसून परदेशातील आहेत. यामुळे हे ॲप भारतातून ऑपरेट केलं जात नसून याचे कोणतेही कार्यालय हे भारतात नाही. हे ॲप्स बनवताना बारकाईने विचार केला आहे की, या ॲप्सला किंवा मेसेजला कुणीही ट्रॅक करू शकत नाही. देशातील विविध तपास यंत्रणांनी या अ‍ॅप्सवर लक्ष ठेवल्यानंतर लक्षात आलं की, या अ‍ॅप्सचा वापर दहशतवाद्यांकडून होत आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी काश्मिरच्या सहकाऱ्यांशी मेसेद्वारे संदेश साधण्यासाठी ॲप्सचा वापर करण्यात आला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version