Success agriculture| दुष्काळात फुलली फलटणच्या शेतकऱ्याची यशगाथा
Success agriculture| फलटण, ता. २५: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळग्रस्त असला, तरी याच तालुक्यातील सासकल गावातील शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर शेतीत उल्लेखनीय यश मिळवल आहे.
मुळीक यांनी केवळ शेतीच नाही तर दुग्ध व्यवसायही यशस्वीरीत्या चालवत आपले कुटुंब सुखी समाधानी केले आहे. आज त्यांच्याकडे नऊ एकर जमीन, आधुनिक शेती साधन आणि एक सुखी कुटुंब आहे.
दुष्काळाचा सामना करून यश:
एक काळ असा होता की, मुळीक कुटुंबाला दैनंदिन गरजेसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र कष्टाच्या जोरावर आणि नवीन प्रयोग करण्याच्या वृत्तीमुळ त्यांनी आपले आर्थिक परिस्थिती बदलून टाकल.
कष्टाची फळे:
आज मुळीक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. त्यांची शेती ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे
वाचा: Success story| अल्पभूधारक शेतकरी अनिल भोसले यांनी दूधव्यवसायातून घेतली बहर
द्राक्ष, डाळिंब, सीताफळ… आणि आणखी:
मुळीक यांनी द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या पिकांची लागवड करून यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ॲव्होकॅडो आणि सफेद जांबू या नवीन पिकांचाही यशस्वी प्रयोग केला आहे.
सेंद्रिय शेती:
मुळीक यांनी सेंद्रिय शेती पद्धतीला प्राधान्य दिले आहे. ते आपल्या शेतात गोमूत्र, शेणखत, गांडूळ खत यांचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या जमिनीचे आरोग्य चांगले राहिले आहे आणि त्यांना रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवता आले आहे.
शेतकऱ्यांसाठी आदर्श:
बबन मुळीक हे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहेत. त्यांची कथा सांगते की, कष्ट आणि धीर्य यांच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य आहे.