राशिभविष्य

Prophecy | अरे बाप रे ! भारतात विषयी बाबा वेंग यांनी केली भीतीदायक भविष्यवाणी; जाणून घ्या काय होणार 2 महिन्यानंतर

Prophecy | आता बल्गेरियातील बाबा वेंगा या भविष्य सांगणाऱ्या अंध महिलेने करून ठेवलेली भाकितं बऱ्याच वेळी खरी होतात, असं म्हटलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भाकितं करून ठेवली आहेत.

आपल्याला माहीतच असेल की सोव्हिएत युनियनचं विघटन, अल-कायदा या दहशतवादी संघटनेने 9/11ला अमेरिकेवर केलेला हल्ला यासह बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं ही आतापर्यंत खरी ठरली आहेत. तसेच बल्गेरियातील अंधबाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर जगातील अनेकांचा विश्वास देखील आहे. परंतु बाबा वेंगा यांनी 2022 सालासाठी अनेक भयंकर भाकितं देखील वर्तवली होती. मग त्यानंतर त्यांनी आता 2023 सालासाठी त्यांनी कोणती भाकितं वर्तवली आहेत, हे जाणून घेवूयात.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

काय केलं आहे बाबा वेंग यांनी भाकीत ?

दरम्यानच, आता बाबा वेंगा यांनी भारताबाबत केलेलं भाकितं हे लोकांच्या मनात भय निर्माण करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी भारताबद्दल काय भाकीत केलं आहे? या संदर्भात ‘अमर उजाला’ने वृत्त दिलंय. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केलं आहे की 2023 मध्ये जगातील तापमान कमी होईल, ज्यामुळे टोळधाड येईल. तसेच अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला देखील करतील. तर यामुळे पिकांचं मोठं नुकसान देखील होईल. परिणामी, भारतात दुष्काळाची परिस्थिती ओढवेल किंवा उपासमारीची देखील परिस्थिती निर्माण होईल. तर याआधी बाबा वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट आहे.

बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकितांमध्ये काही देशांत पाणी टंचाई उद्भवेल, असं म्हटलं होतं.
तर मग पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांना त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच 1950 च्या दशकानंतर या देशांमध्ये पाऊस कमी पडतोय, त्यामुळे इथे दुष्काळजन्य परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागतो आहे. तसेच बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं, की या वर्षी आशियातील काही देश व ऑस्ट्रेलियामधील काही भागात पूर येईल. त्याशिवाय भूकंप व त्सुनामीचं भाकित देखील त्यांनी वर्तवलं होतं. तसेच त्यानुसार, या वर्षी मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात हाहाकार माजला. तसेच बांगलादेश, भारताचा ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमधील लोकांना देखील पुराचा फटका बसला आहे. यावरून बाबा वेंगा यांचं हे भाकीतही खरं ठरलं होतना दिसतं आहे.

वाचा: बापरे!नोव्हेंबर ची थंडी आटोक्यात, मात्र डिसेंबर मध्ये कडाक्याची थंडी सह पावसाची शक्यता ..!

कोण होत्या बाबा वेंगा?

बल्गेरियातील बाबा वेंगा या दृष्टिहीन महिला साधू होत्या.
तसेच 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दृष्टी गेली. तरी देखील त्यांनी वर्तवललेली अनेक भाकितं ही आतापर्यंत खरी ठरली आहेत. तसेच त्यांचे 85 टक्के अंदाज हे खरे ठरल्याचं सांगण्यात येतंय. ऑगस्ट 1996 मध्ये बाबा वेंगा यांचं स्तनाच्या कर्करोगाने निधन झालं. तर पण मृत्यूपूर्वीच त्यांनी 5079 सालापर्यंतची भाकितं सांगून ठेवली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Oh father! Baba Weng’s Scary Prophecy About India; Find out what happens after 2 months

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button