शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये वादळ तसेच विजांचे प्रमाण जास्त आहे. जनावरे बाहेर झाडाखाली किंवा खांबाजवळ बांधू नये. विजा पडण्याची जास्त शक्यता असते. शेतकऱ्यांसाठी (farmers) महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंतच्या वेळेत शेतकऱ्यांनी काळजी घेयला हवी. विजांचे प्रमाण जास्त असल्याने या वेळेत शेतीची कामे करू नका. शेतकऱ्यांना (farmers) विशेष काळजी घेण्यास जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
वाचा –
कर्करोग ते मधुमेहापर्यंतच्या आजारांवर रामबाण उपाय; “या” फळाने आरोग्याच्या सोडवल्या सर्व समस्या, फिटनेससाठी पहाच
पुढील काही दिवसात मोठ्या पावसाचा इशारा दिला गेला आहे. शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्या. जनावरांना (animals) व स्वतःला सुरक्षित ठिकाणी ठेवा. विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर पडू नये. जनावरांना झाडाखाली किंवा खांबाखाली बांधू नका. विजांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. 3 ते सायंकाळी 7 पर्यंत कोणतीही कामे करू नका किंवा बाहेर पडू नका. शक्यतो या वेळेत शेतातील कामे टाळा. स्वतःला सुरक्षित ठेवा.
विजा पडण्याची शक्यता –
विजा पडण्याची शक्यता असल्याने पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे व जिल्हयातील (district) काही मध्यम प्रकल्प (Project) / बॅरेजेस (Barrages) पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा (Alert) देण्यात येत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा-
मांजरा प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरु असल्याने हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. मांजरा नदीवरील बॅरेजेस (Barrages) देखील पूर्णपणे भरले असून धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्यास तसेच येणारा पाण्याचे आवक वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मांजरा नदी वरील सर्व नदीकाठच्या गावातील लोकांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा