CWG 2022 | शेतकरी पुत्राची ऐतिहासिक कामगिरी! राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं ऐतिहासिक पदक
CWG 2022 | स्टार अॅथलीट अविनाश साबळे यांनी शनिवारी राष्ट्रकुल गेम्स-2022 मध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत भारताला नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक मिळवून दिले. अविनाश साबळे (Avinash Sable) यांनी 8:11.20 अशी वेळ घेत पदक जिंकले. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हा शेतकरी (Agriculture) पुत्र आहे. अविनाशने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट तसेच राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Championship) रौप्यपदक जिंकणारे अविनाश हे पहिले भारतीय खेळाडू आहे.
शेतकरी पुत्राचे यश
शेतकऱ्याचा पूर्व शेतकऱ्याचा पोरगा काय करू शकतो हे आज अविनाश यांनी दाखवून दिला आहे. अगदी खेड्यापाड्यात दुष्काळी भागात जरी लहानाचा मोठा झाला असला तरी त्याने परदेशापर्यंत आपल्या कामगिरीचा इतिहास रचला आहे. इतकचं नाहीतर, अविनाश साळवे भारतीय आर्मीमध्ये कार्यरत आहे. अविनाश मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. अविनाश यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण बीड जिल्ह्यातच पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात गेले आणि तिथेच पूर्ण केले. तर आता ते आपल्या कुटुंबासह बंगळुरूमध्ये राहतात.
वाचा: या’ 3 कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले लोक झाले करोडपती, 1 लाखांचे झाले 2 कोटी
क्रीडाविश्वातील रस
अविनाश यांनी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरच भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. सैन्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी क्रीडादलामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथेच त्यांनी क्रीडा विश्वामध्ये रस दाखवत चॅम्पियनशिप पूर्ण केली. अविनाश यांनी आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तर सध्या ते भारतीय सैन्यदलात जूनियर कमीशंड ऑफिसर (JCO) या पदावर कार्यरत आहेत.
वाचा: बाप रे! म्हशीच्या आत्म्याने केला मानवी शरीरात प्रवेश, विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ
परदेशातही उमटवला आपल्या नावाचा ठसा
अविनाश साळवे यांनी केवळ देशातच आपल्या क्रीडाकलेची कामगिरी दाखवली नाही, तर त्यांनी परदेशापर्यंत आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. अविनाश साळवे यांनी याचवर्षी मे महिन्यात 5 हजार मीटर शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत, अमेरिकेत अविनाश साबळे यांनी इतिहास रचला आहे. या यशानंतर शेतकरी पुत्राचे देशभरात कौतुक होत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
Web Title: Historic performance of the farmer’s son! A historic medal won in the Commonwealth Games