Crop Insurance | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती (Agriculture) पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड सोसावा लागला आहे. याचसाठी आता पीक विमा योजनेंर्गत शेतकऱ्यांना (Farming) मदतीचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, पिक विमा कंपन्यांना बजावून देखील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे (Crop Insurance) वितरण करण्यात आलेले नाही. म्हणूनच कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी कंपन्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनेनंतर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण करण्यात आले आहे.
वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा?
आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) तब्बल 86 कोटी 54 लाख 78 हजार 718 रुपयांच्या निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे.
बिग ब्रेकिंग! गायरान जमीन अतिक्रमणाबाबत कोर्टाचा दिलासादायक निर्णय; जाणून घ्या सविस्तर…
पीक विमा दावे
तर परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी खरिप हंगामात 5 लाख 10 हजार 724 हेक्टरवर पेरणी झाली होती. ज्यासाठी एकूण 6 लाख 71 हजार 573 विमा शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) पीक विम्याची प्रस्ताव केले होते. तर शेतकऱ्यांनी 4 लाख 38 हजार 812 हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. त्यांनंतर सर्वेक्षण करून आता शेतकऱ्यांना (Type of Agriculture) कोट्यवधींच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीकविमा भरपाई
तालुका शेतकरी विमा भरपाई रक्कम
• परभणी 55001 18.0642
• जिंतूर 52619 11.6696
• सेलू 41916 8.4183
• मानवत 23206 7.0192
• पाथरी. 33645 8.5086
• सोनपेठ 23831 6.5493
• गंगाखेड 32244 7.1843
• पालम 41627 7.8853
• पूर्णा 45098 11.2486
सोयाबीनसाठी मध्यम हंगाम पीकविमा भरपाई
तालुका शेतकरी विमा भरपाई रक्कम
• परभणी 29562 17.2248
• जिंतूर 9191 5.1643
• मानवत. 6067 3.9975
• सोनपेठ 6605 4.1639
• गंगाखेड 13632 5.8618
• पूर्णा 8778 4.3145
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नव्या युगातील ‘या’ 5 पिकांतून मिळेल एकरी प्रचंड नफा, परदेशातूनही आहे मागणी
- कर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Web Title: Good news for farmers! As much as 86 crores of crop insurance has been collected on the accounts of farmers in district