योजना

तब्बल 7 लाख शेतकऱ्यांचे पीएम किसान निधीचे पैसे जमा झाले नाहीत; त्याची ही आहेत कारणे, काळजी घ्या..

पंतप्रधानांच्या किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi) योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात 10,40,28,677 शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यात पैसे जमा केले. त्याच बरोबरच 7,24,042 शेतकऱ्यांचे (farmers) पैसे हे जमा झाले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे व अर्ज भरा. चुकीच्या प्रोसेसमुळे स्वतःचे नुकसान करून घेत असताना दिसत आहे.

वाचा –

शेती सुलभ करण्यासाठी 1.58 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले आहेत. काही लोक आहेत ज्यांना अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत. त्याचे कारण अनेक शेतकरी हे काळजीपूर्वक फॉर्म भरत नाहीत, फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरा. तुमच्या अर्जाची तपासणी होते. बँक खाते क्रमांक(बँक खाते) तसेच आयएफएससी ( IFSC) कोड योग्य प्रकारे भरा.

वाचा

पैसे जमा न होण्याची कारणे –

1) चुकीच्या खात्यामुळे तात्पुरते थांबवलेले असतील. पण खात्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यावर पैसे जमा होणार आहेत.
2) तुम्ही दिलेला खाते क्रमांक बँकेतच नव्हता. याचा अर्थ चुकीचा खाते क्रमांक भरला आहे.
3) वित्त व्यवस्थापन यंत्रणेनेाध्ये तुमचा सहभागच झालेला नसेल तरीपण पैसे जमा होत नाहीत.
4) बँकेने जर तुमचे खाते अमान्य केले तरी पैसे जमा होणार नाहीत.
5) पीएफएमएस/ पीएफएमएस बँकेने शेतकरी नोंदी नाकारल्या आहेत.
6) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आधार (आधार कार्ड) जमा केले गेले नाही.
7) राज्य सरकारच्या वतीने दुरुस्ती प्रलंबित असेल तरी पैसे हे जमा होत नाहीत.

हे ही

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button