जॉब्स

Teacher Recruitment | मोठी बातमी! राज्यात तब्बल 32 हजार शिक्षक भरती; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि भरतीचे ‘3’ टप्पे

Big news! As many as 32 thousand teachers are recruited in the state; Know the eligibility, application process and '3' stages of recruitment

Teacher Recruitment | महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये 32 हजार पदांच्या शिक्षक भरतीला आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा परिषदांच्या जवळपास 63 हजार शाळांमध्ये 30 हजारांवर शिक्षक तर खासगी संस्थांमध्येही 15 हजारांवर शिक्षक कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतानाही तब्बल साडेसहा-सात वर्षे जिल्हा परिषद शाळांचा गाडा तसाच ओढला जात होता. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी शिक्षक भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे 23 हजार आणि खासगी अनुदानित संस्थांमधील सात ते नऊ हजार पदांची भरती सुरु झाली आहे. 16 ऑक्टोबरपासून संस्थांसह ज्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम झाली, त्यांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्याचे आदेश निघाले आहेत. तीन आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दरम्यान, सध्या राज्यातील 24 जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम झाली असून आणखी दहा जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जात आहे.

भरती प्रक्रियेचे टप्पे
16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड करणे
15 नोव्हेंबरनंतर तीन आठवड्यात उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरून देणे
डिसेंबरअखेर ते 30 जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नेमणुका.

वाचा : Job Update | तरुणांसाठी सुवर्णसंधी! राज्यात ‘या’ पदावर नोकर भरतीला सुरुवात, सरकारने ‘या’ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

खासगी संस्थांना मुलाखतीचे बंधन
खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदे भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्य स्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठविले जाणार आहे. त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.

भरतीसाठी आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता: शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
अनुभव: शिक्षण क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव
वय: 18 ते 40 वर्षे

भरतीसाठी अर्ज कसा करावा
उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल.

भरती प्रक्रियेचा लाभ
ही भरती राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यास मदत करेल.
या भरतीमुळे राज्यातील शिक्षकांची कमतरता दूर होईल.
या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

भरती प्रक्रियेचा आढावा
राज्यातील 32 हजार शिक्षक भरतीला आजपासून प्रारंभ झाला.
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे 23 हजार आणि खासगी अनुदानित संस्थांमधील सात ते नऊ हजार पदांची भरती सुरु झाली आहे.
भरती प्रक्रियेचे तीन टप्पे असतील.
भरतीसाठी आवश्यक पात्रता शैक्षणिक, अनुभव आणि वय अशी आहे.
भरतीसाठी अर्ज पवित्र पोर्टलवर करता येईल.

हेही वाचा :

Web Title: Big news! As many as 32 thousand teachers are recruited in the state; Know the eligibility, application process and ‘3’ stages of recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button