इतर

वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

Are you considering a personal loan? Then compare which bank has what interest rate

कोरोनाच्या (Of Corona) या कालावधीत अनेक व्यवसाय कोलमाडीस आले आहेत, तसेच पैशाची देखील मोठ्या प्रमाणात चणचण जाणवू लागली आहे. काही लोक धंदे तसेच नोकरी गेल्यामुळे पुन्हा उभा राहण्याकरिता व्यक्तिगत कर्ज (Personal loan) घेण्याच्या विचारात आहे, अशा वेळेस कोणत्या बँकेचे (Of the bank) किती व्याजदर (Interest rate) आहे हे विचारात घेणे केव्हाही फायद्याचे ठरते.

लोकांची क्रयशक्ती (Purchasing power) वाढवण्याकरता बॅंका देखील व्यक्तिगत कर्ज (Personal loan) देण्याकरिता तयार आहेत, सरकारच्या धोरणाला अनुसरून बँक स्वस्तात पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जे देऊ लागल्या आहेत.

चला तर व्यक्तिगत कर्ज घेण्यासाठी कोणती बँक उपयुक्त ठरेल व त्याचा कर्जावरील व्याजदर किती टक्के आहे हे आपण पाहू.

एसबीआय: (SBI) स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही एक गव्हर्मेंट बँक (Government Bank) असून, या बँकेत वीस लाखापर्यंत पर्सनल लोन दिले जाते. याकरता एसबीआय 9.60 ते 13.85% वार्षिक व्याज आकारत आहे.

एचडीएफसी: (HDFC)
खाजगी क्षेत्रातील (In the private sector) ही सर्वात चांगली बँक असून, यामधील सेवादेखील अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. या बँकेमध्ये वैयक्तिक कर्ज तीस लाख रुपयांपर्यंत दिले जाते.वैयक्तिक कर्जासाठी वार्षिक 9.75 ते 15 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

सिटी बँक: (Citibank) या बँकेत व्यक्तिगत लोन 50000 पासून ते तीस लाख रुपये देण्यात येते यासाठी सिटी बँक वैयक्तिक कर्जावर 9.99 टक्क्यांपासून 16.49 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

बँक ऑफ बडोदा: (Bank of Baroda)
बँक ऑफ बडोदाबद्दल बोलायचे झाल्यास ही आघाडीची बँक 10 ते 15.60 टक्के वार्षिक व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे.

आयसीआयसीआय बँक: (ICICI Bank)
देशातील दुसर्‍या क्रमांकाची खासगी बँक ओळखली जाते.आयसीआयसीआय बँक 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.50 टक्के ते 19 टक्क्यांपर्यंत व्याज दर (Interest rate) आकारत आहे.

अ‍ॅक्सिस बँक: (Axis Bank) अ‍ॅक्सिस बँक 15 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर वार्षिक 12 ते 21 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

कोटक महिंद्रा बँक: (Kotak Mahindra Bank )
कोटक महिंद्रा बँक 50000 ते 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.75 टक्क्यांपासून 24 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

अशा प्रकारे तुम्ही विविध बँकेचे, व्यक्तिगत कर्जाचे व्याज दर याची तुलना करून, कोणत्या बँकेत व्यक्तिगत कर्ज घ्यायचे आहे हे ठरवले जाऊ शकते. जेणेकरून तुम्हाला आर्थिक फायदा होईल.

हे हि वाचा :

1. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री! वाचा देशात आजपासून ‘कोणते’ होणार महत्त्वाचे बदल?

2. दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button