“पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी” योजनेमध्ये ‘ह्या’ चुका झाल्या आहेत का? चला तर करा लगेच दुरुस्त! नाहीतर मुकाल दोन हजार रुपये..
Are there any mistakes in the "Prime Minister's Farmers Honor Fund" scheme? Let's fix it right away! Otherwise Mukal two thousand rupees ..
शेतकरी बांधवासाठी भारत सरकार काही ना काही योजना काढत असते. त्यातील एक योजना म्हणजे,
PM शेतकरी सन्मान निधी (PM Farmers Honors Fund)योजना होय. या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा. तसेच बियाणे , खते खरेदी करण्यासाठी रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.
2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंट वर जमा केले जातात. परंतु या वर्षी या योजनेत बदल करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार आणि कोणाला वगळणार, हे स्पष्ट केले आहे. याचा उद्धेश फक्त्त गरीब शेतकरी बांधवाना लाभ मिळणे होय.
हेही वाचा :कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!
अर्जावर शेतकऱ्यांनी आपले नाव इंग्रजीमध्येच लिहिणं आवश्यक आहे. इतर भाषेत नाव लिहिल्यास ते बदलणं गरजेचं आहे.
शेतकऱ्याचं खातं आणि अर्जावरील नावात ‘स्पेलिंग मिस्टेक’ (‘Spelling mistakes’) नसावी.
बँकेचा IFSC कोड लिहिण्यात चूक करू नका.
बँक खात्याची माहिती देताना कोणतीच चूक करू नका.
तुमचा पत्ता, गावाच्या नावाची स्पेलिंगही तपासा.
अर्ज भरताना या चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करता येतील.
हेही वाचा :सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे
त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. तेथे ‘फार्मर्स कॉर्नर’वर (On ‘Farmers Corner’) क्लिक करा. नंतर ‘आधार एडिट’च्या लिंकवर क्लिक करा. नंतर आधार क्रमांक दुरुस्त करा. खातेक्रमांक (Account number) चुकीचा असेल, तर तोही दुरुस्त करू शकता.
कृषी विभाग कार्यालय (Department of Agriculture Office) किंवा लेखापाल यांच्याशी संपर्क करुन चुका दुरुस्त करता येतील.
हेही वाचा :
तारफुली पद्धत म्हणजे काय? जाणून घ्या कोणत्या पिकासाठी ही उपयुक्त ठरते…
जाणून घ्या; ‘भुईमूग लागवड’ विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…