दुधामध्ये फॅट (Fat in milk) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, दुधामधील फॅटवर दुधाची किंमत अवलंबून असते तसेच दुधाची गुणवत्ता, चव,रंग, हे देखील अवलंबून असतात. गाईच्या दुधाची किमान फॅट 3.8 आणि म्हशीच्या दुधाची फॅट 6 असणे आवश्यक आहे. बर्याच कारणांमुळे दुधातील फॅट कमी होते, व शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला (To the financial crisis) सामोरे जावे लागते, त्यामुळे आपल्या सदरामध्ये दुधातील फॅट कमी होण्याची कारणे तसेच त्यावर काय उपाययोजना कराव्यात हे पाहणार आहोत.
दुधातील फॅट कमी होण्याची प्रामुख्याने कारणे पुढीलप्रमाणे…
दुग्धजन्य जनावरांचा आहार :(Dairy feed)
दुधातील फॅट कमी होण्यामागे सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा आहार हे होय.काही पशुपालक गाई-म्हशींच्या आहारात खाद्याबरोबर तेलाचा वापर करतात. आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅट मध्ये थोडी वाढ होते. परंतु खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचन क्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधाचे प्रथिनांमध्ये घट येते.
दूध काढण्याच्या वेळा:(Milking times)
दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असावे. हे अंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकेल पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
हे ही वाचा : हे १० शेतीपूरक व्यवसाय करा आणि मिळवा लाखो रुपयांचा नफा
अनुवंशिकता(Heredity)
जनावरांची अनुवंशिकता किंवा जात ही फॅटच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण एक गुणधर्म गुणसूत्र द्वारे नियंत्रित केले जाते.
दुभात्या जनावरांना आजाराची लागण
संकरित गाई मध्ये कासदाह हा कासेचा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. कासदाह झालेल्या गाईच्या दुधातील फॅटचे प्रमाण सरासरी पेक्षा जवळजवळ निम्म्याने कमी झाले असते.
गाभण असल्यास(If pregnant)
गायीच्या गाभण काळातील आरोग्याचेही दुधातील फॅटवर परिणाम होतात.
हवामानाचा परिणाम(The effect of weather)
पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने दूध उत्पादन वाढते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश व वाढलेली दिसून येते. उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. अशा वेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.
हे ही वाचा : पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…
दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा पुढील उपाय योजना…
(Next steps to increase milk fat )
1) जनावरांचा आहार
जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावे. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. भाताचा पेंढा, गव्हाचा काड इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट कमी होतात.
2)गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तुर, हरभरा, मुगचुनी, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
3) जनावरांचे आरोग्य (Animal health)
दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणात देखील वाढ होईल व दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
4)पशु तज्ञांचा सल्ला (Veterinarian advice)
दुधाळ जनावरांना होत नाहीत. कासदाह झाल्यास पशुतज्ज्ञांकडून त्वरित उपचार करावेत.
जास्त वयस्क जनावरे, सातव्या वेताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नयेत.
हेही वाचा
पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!
या’ जिल्हात ‘जांभळाची’ ऑनलाईन विक्री, शेतकऱ्यांना मिळाला घवघवीत बाजारभाव…