कृषी तंत्रज्ञान

अ‍ॅक्वापॉनिक्स शेती म्हणजे एक भन्नाट नवीन तंत्र, कशी फायदेशीर ठरेल अ‍ॅक्वापॉनिक्स शेती…

Aquaponics farming is an abandoned new technique, how can Aquaponics farming be profitable

अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) उपयोग करून शेती व्यवसाय केला जातो, वाढणारी लोकसंख्या, (Population) जागेची कमतरता शेती करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो, महाराष्ट्रातील (In Maharashtra) एका अभियंत्याने अ‍ॅक्वापॉनिक्सद्वारे (By Aquaponics) व्यवसायाचे यशस्वी मॉडेल उभं केले आहे. चला जाणून घेऊया कशी फायदेशीर ठरेल अ‍ॅक्वापॉनिक्स शेती…

‘अ‍ॅक्वापॉनिक्स’ शेती म्हणजे अ‍ॅक्वा (Aqua) म्हणजे पाण्याशी संबंधित किंवा संबंधित काम आणि पोनिक्स (Ponics) म्हणजे हिरव्या भाज्या (Greens) होय. या शेतीमध्ये मशागतीसाठी जमिनीचा वापर केला जात नाही, म्हणजे ही शेती पाण्यावर केली जाते. शेतीसाठी आवश्यक असते फक्त एक फ्लोटिंग कार्ड ठेवून (By placing a floating card) त्यामध्ये भाज्या वाढतात.

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी किटकनाशके (Pesticides) किंवा कोणतेही खत (Fertilizer) देण्याची गरज नाही. पिके आपल्या आवश्यक असणारे घटक पाण्यातून शोधून काढतात. मात्र यासाठी आपणास प्रथमता भाज्यांची रोपं प्रथम एका लहान ट्रेमध्ये (In the tray) तयार करावी लागतात, त्यानंतर फ्लोटिंग बोर्डवर ठेवली जातात.

भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..

अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीच्या माध्यमातून आपण मासे आणि भाज्यांची यांची एकत्रितपणे शेती करू शकतो, यामुळे आपणास दुहेरी आर्थिक लाभ होतो. मस्यशेती (Aquaculture) करून आपणास शेतीसाठी खत देखील उपलब्ध होते.

अ‍ॅक्वापॉनिक्ससाठी पॉलिहाऊस (Polyhouse) असणं आवश्यक आहे. त्याखेरीज दोन मोठ्या गोलाकार टाक्या आवश्यक असतात ज्यामध्ये मत्स्यपालन केलं जातं. प्रत्येक टाकीचे पाणी बाहेर येत राहते आणि दुसर्‍या टँकमध्ये जाते जिथे शुद्ध पाणी पाईपमध्ये जाते आणि नंतर माशांचे पाणी पाईपमधून जाते. यानंतर माशांचे पाणी भाजीपाला रोपांना मिळते. भाजीच्या रोपांचीमुळे त्या पाण्यातून आवश्यक पोषणतत्वे (Nutrients) घेतात, त्यानंतर पाणी परत माशांच्या टाकीवर येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button